पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पायाला लागली गोळी

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पायाला लागली गोळी

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जीवघेणी हल्ला करण्यात आला आहे. गुजरानवाला येथे सुरु असलेल्या त्यांच्या रॅलीमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात इम्रान खान यांच्या डाव्या पायाला गोळी लागली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय या गोळीबारात एकाच मृत्यू तर नऊ जण जखमी झाल्याची माहिती आहे.

इम्रान खान यांच्यावर चार ते पाच जणांनी हल्ला केला. यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मारेकऱ्यांनी AK – 47 पिस्तुलाने गोळीबार केल्याची माहिती आहे. पाकिस्तानच्या सरकरावर इम्रान खान टीका करतात त्यामुळे त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे, असा आरोप इम्रान खान यांच्या समर्थकांकडून करण्यात येतं आहे. इम्रान खान यांच्यावर गोळीबार करण्याचे षडयंत्र होते, असंही म्हटलं जातं आहे.

गोळीबारात इम्रान खान यांच्या डाव्या पायाला गोळी लागली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, मी पुन्हा ताकदीनिशी लढणार, अशी गोळीबारानंतर पहिली प्रतिक्रिया इम्रान खान यांनी दिली आहे. गोळीबारात पाकिस्तानी नेता फैसल खानही जखमी झाल्याची माहिती आहे. यादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी गोळीबाराचा अहवाल मागवला आहे.

हे ही वाचा:

एकीकडे टीका तर दुसरीकडे मुखपत्रात जाहिरातबाजी

सरनाईकांचे प्रताप; आता सहन करावा लागणार नवा मनस्ताप

भारताने बांगलादेशला नमवले आणि पाकिस्तानची केली कोंडी

नाशिकमध्ये देशातील पहिली खासगी बाजार समिती

यापूर्वी पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनिझिर भुत्तो यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यामध्ये बेनिझिर भुत्तो यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इम्रान खान यांच्यावर हल्ला होऊ शकतो अशी शक्यता या आधीच अनेकांनी व्यक्त केली होती.

Exit mobile version