28 C
Mumbai
Thursday, January 2, 2025
घरक्राईमनामासुधीर मोरे आत्महत्या प्रकरणी माजी आमदारांच्या मुलीला अटक

सुधीर मोरे आत्महत्या प्रकरणी माजी आमदारांच्या मुलीला अटक

आत्म्हत्येपूर्वी केले होते ५६ फोन

Google News Follow

Related

विक्रोळी येथे राहणारे ठाकरे  गटाचे माजी नगरसेवर सुधीर मोरे यांनी काही दिवसांपूर्वी रेल्वे खाली आत्महत्या केली होती. त्यांचा मृतदेह विद्याविहार आणि घाटकोपर या रेल्वे स्थानकांदरम्यान रुळावर आढळल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम ३०६ (abetment of suicide) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी एका महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या महिलेकडून सुधीर मोरे यांना मानसिक त्रास दिला जात होता अशी तक्रार मोरे यांच्या मुलाने दिली होती.

आत्महत्येप्रकरणी शिवसेनेचे माजी आमदार शांताराम चव्हाण यांची मुलगी निलिमा चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. निलिमा चव्हाण आणि सुधीर मोरे यांच्यात शेवटचा संवाद झाल्याची माहिती समोर आली होती. सुधीर मोरे यांना दोन महिन्यांपासून ही व्यक्ती ब्लॅकमेल करत होती. मोरे हे गुरुवारी रात्री अकरा वाजता खासगी बैठक असल्याचे सांगून अंगरक्षकाशिवाय घराबाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी घाटकोपर ते विद्याविहार दरम्यान रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी सुधीर मोरे यांच्या मोबाईलवर महिलेने ५६ कॉल केले होते. याप्रकरणी निलिमा चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली आहे. निलिमा चव्हाण यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला आहे. सुधीर मोरे यांना निलिमा यांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान सरकारी वकील इक्बाल सोलकर यांनी पोलिसांच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, निलिमा चव्हाण यांनी सुधीर मोरे यांना माझ्याशी संबंध ठेव नाहीतर न ठेवल्यास जीवन संपवून टाकू, अशी धमकी दिली होती. तसेच आत्महत्येपूर्वी त्यांनी मोरे यांना ५६ वेळा फोनकॉल केले होते. याशिवाय व्हॉट्सअॅपवर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करण्यात आले होते. मोरे यांनी चव्हाण यांना छळ थांबवण्याची विनंती केली होती. मात्र, चव्हाण यांनी त्यांचे काहीही न ऐकता त्यांना ब्लॅकमेल करणे थांबवले नाही.

हे ही वाचा:

स्माईल प्लीज! आदित्य एल- १ ने पाठवला पहिला सेल्फी

दहीहंडीच्या दिवशी ढगांचे थर आणि वर्षोल्हास

‘भारत’मुळे I.N.D.I.A.ला फुटला घाम

अक्षयकुमारच्या चित्रपटाच्या नावात आता ‘भारत’

गेल्या काही महिन्यांपासून सुधीर मोरे यांना कोणीतरी ब्लॅकमेल करत असल्याची माहिती समोर आली होती. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचं त्यांच्या जवळच्या लोकांकडून सांगण्यात आले होते. सुधीर मोरे हे ठाकरे गटाचे रत्नागिरीचे संपर्कप्रमुख होते. सुधीर मोरे हे शिवसेनेचे नगरसेवक आणि विभागप्रमुखही होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंना पाठींबा दिला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा