अखेर प्रदीप शर्मा अटकेत

अखेर प्रदीप शर्मा अटकेत

एन्काउंटर स्पेशलिस्ट असलेल्या माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून अटक करण्यात आली आहे. अँटिलिया स्फोटकांचे प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाशी संबंधित ही अटक झाली आहे. या आधी शर्मा यांची तब्बल सहा तासांची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) करण्यात आली.

गुरुवारी सकाळी ६ वाजल्यापासूनच राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील निवासस्थानी दाखल झाले. यावेळी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांसोबतच मुंबई पोलीस दलाचे पथक आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पथकही हजर होते. त्याआधी शर्मा यांना लोणावळ्यातून ताब्यात घेतण्यात आले होते. शर्मा यांच्या घराची झडती घेतल्यानंतर आणि तब्बल सहा तास शर्मा यांची चौकशी करण्यात आल्यानंतर अखेर राष्ट्रीय तपास यंत्रणेने शर्मा यांना अटक केली.

हे ही वाचा :

मराठा, ओबीसींच्या आरक्षणावरून ठाकरे सरकारने मोठं षडयंत्र रचलं

ठाकरे सरकार विरुद्ध नाशिकमध्ये ओबीसी मोर्चा

शिवसेनेच्या अटक झालेल्या नेत्यांचे गॉडफादर कलानगरमध्ये बसलेले आहेत काय?

रत्नागिरीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

शर्मा यांनी सचिन वाझेला स्फोटके ठेवणे व मनसुख हत्या प्रकरणात मदत केली होती असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध एनआयएच्या हाती पुरावे लागले आहेत. अंधेरी येथील शर्मा यांच्या निवासस्थानी टाकण्यात छापेमारीत एनआयएच्या हाती या प्रकरणाच्या संबंधी काही महत्वाचे तांत्रिक पुरावे हाती लागले असल्याची माहिती मिळत आहे. या पुराव्यांच्या आधारेच अखेर प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. या आधीही दोन वेळा मुंबई येथील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कार्यालयात शर्मा यांची चौकशी झाली होती.

शर्मा यांना अटक केल्यानंतर आता जे जे रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. तर तेथुन त्यांना एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अंटालिया स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणातील ही ८ वी अटक आहे. तर ठाण्यातील आणखी एक अधिकारी एनआयएच्या रडारवर असल्याची माहिती पुढे येत आहे. या अधिकाऱ्याला देखील लवकरच चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

मनसुख हिरेन याची हत्या का करण्यात आली हे जरी उघडकीस आले असले तरी मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार तसेच त्यात मिळून आलेले धमकीच्या पत्राचे गूढ आद्यप समोर आलेले नाही. स्फोटकांनी भरलेल्या कार ठेवण्यामागे नेमके काय कारण असू शकते याबाबत अनेकांना उत्सुकता लागलेली आहे, त्यात अनेक तर्कवितर्क काढण्यात आले होते. मात्र खरे कारण समोर आलेले नव्हते. परंतु प्रदीप शर्मा यांच्या अटकेनंतर हे गूढ उकलण्याची शक्यता असून लवकरच आंबानी यांच्या घराजवळील स्फोटकांनी भरलेल्या कार ठेवण्यामागच्या कारणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version