अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरण हत्याकांड प्रकरणात चकमक फेम निवृत्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा याला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जानेवारी महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने शर्माचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी न्यायालयाने प्रदीप शर्माला जामीन मंजूर केला आहे.
प्रदीप शर्मा यांना जून २०२१ मध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटके आणि ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरण हत्याकांड प्रकरणात अटक करण्यात आली होती. शर्मा यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत खून, गुन्हेगारी कट, अपहरण, बेपत्ता करणे आणि पुरावे नष्ट करणे यासारख्या आरोपांसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण बंद
शिवडीच्या चाळीत सापडले २ कोटींचे मेफेड्रोन
देवा महाराजा, उद्या फक्त ‘विक्रम’ जल्लोष होऊ दे!
शिवडीच्या चाळीत सापडले २ कोटींचे मेफेड्रोन
२३ जानेवारी रोजी, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या नेतृत्वा खालील खंडपीठाने, विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळताना एनआयए तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. सर्वोच्च न्यायालयाने शर्मा यांच्या पत्नीच्या शस्त्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर त्यांना दोन आठवड्याचा जामीन मंजूर केला होता, त्यानंतर २४ जुलै रोजी अंतरिम जामीन दोन आठवड्यांनी पुन्हा वाढवला होता.
बुधवारी त्यांना या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
प्रदीप शर्मा यांना या प्रकरणात मिळालेल्या जामीनामुळे अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरण हत्याकांड प्रकरणात तुरुंगात असलेल्या बडतर्फ पोलीस निरीक्षक सुनील माने आणि इतर आरोपींच्या जामिनाचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजे हा आहे.