26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामाव्हीआयपींच्या सेवेत गुंतलेल्या वन अधिकाऱ्यांना कर्तव्याचा विसर!

व्हीआयपींच्या सेवेत गुंतलेल्या वन अधिकाऱ्यांना कर्तव्याचा विसर!

Google News Follow

Related

राजस्थानमधील सरिस्का अभयारण्यात २७ मार्च रोजी आग लागली. ही आग अद्याप विझवण्यात यश आलेलं नाही परंतु सुदैवाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. आतापर्यंत ७०० हेक्टरहून जास्त जंगल या आगीच्या विळख्यात सापडलं आहे. या आगीचे नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून ही आग वनाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पसरली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सीसीएफ आर एन मीणा या अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे.

रविवार, २७ मार्च रोजी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास या जंगलात आग लागली होती. त्यानंतर या आगीची माहिती काही वेळेतच वायरलेसवरुन अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली होती. परंतु, या दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची पत्नी अंजली तेंडुलकर या अभयारण्यात आल्या होत्या. त्यामुळे या व्हीआयपी पाहुण्याच्या सेवेत सर्व अधिकारी व्यस्त होते. त्यामुळे या आगीकडे दुर्लक्ष करण्यात आलं असावं आणि हे अधिकारी जंगलातील आग विझवायला विसरले.

हे ही वाचा:

‘नवाज शरीफ यांनीच भारताला अजमल कसाबचा पत्ता दिला’

मेघालयचे म्हणताहेत असा मी ‘आसामी’

आदित्य ठाकरेंच्या सभेत फडणवीस?

महाविकास आघाडीचे आणखीन २ नेते तुरुंगात जाणार?

अंजली तेंडुलकर यांच्या गाडीचे ड्रायव्हिंग हे स्वत: सीसीएफ आर एन मीणा हे करत होते. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी वायूसेनेचे दोन हेलिकॉप्टर बोलावण्यात आले आहेत. अंजली तेंडुलकर या सरिस्का अभयारण्यात पोहोचल्या आणि त्यानंतर केवळ १५ मिनिटांमध्ये आग लागल्याची बातमी वायरलेसवरुन अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवण्यात आली होती. तसेच सीसीएफ मीणा हे त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित होत्याचे सांगितलं जात आहे. मात्र, या सर्व अधिकाऱ्यांनी त्यावेळी त्या आगीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर अंजली तेंडुलकरांना टायगर सफारी घडवणाऱ्या आणि त्यांच्या गाडीचे स्वत: ड्रायव्हिंग करणाऱ्या सीसीएफ आर एन मीणा यांना निलंबित करण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा