कुठे सापडले पाहा सात कोटींचे अमली पदार्थ

कुठे सापडले पाहा सात कोटींचे अमली पदार्थ

अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधातील कारवाई आता अधिक कठोर होऊ लागली असून विमानतळाहूनच एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. या विदेशी नागरिकाकडे सात कोटींचे अमली पदार्थ सापडले खरे पण ते कुठे लपविले होते, हे कळल्यानंतर मात्र पोलिसही हबकून गेले.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आलेल्या या विदेशी नागरिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोटातील हे लपवून ठेवलेले अमली पदार्थ काढण्याचे डॉक्टर शर्थीने प्रयत्न करीत आहेत.

हे ही वाचा:
श्रीरामपूरमध्ये संतापाची लाट; लव्ह जिहादचे जाळे टाकून अल्पवयीन मुलीला पळवले

रंगकर्मींना खंडणीखोर सरकारने वाऱ्यावर सोडून दिले

रेल्वेशी चर्चा न करताच ठाकरे सरकारची घोषणा

अंध मोदी विरोधक यातून बोध घेतील का?

एनसीबीने संशयावरून या विदेशी नागरिकाला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेतले होते. एनसीबीच्या सूत्रानुसार या विदेशी नागरिकाने सुमारे ७ कोटी रुपयांचे अमली पदार्थ पोटात भरून जाण्याच्या तयारीत असतांना त्याला विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. बॉडी स्कॅन मध्ये त्याच्या पोटात संशयास्पद कॅप्सूल आढळून आले. त्याला ताबडतोब रुग्णालयात आणण्यात आले असून त्याच्या पोटातील अमली पदार्थांनी भरलेल्या कॅप्सूल काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हे अमली पदार्थ ७ कोटी रुपये किमतीचे असल्याचे समोर येत आहे, हे अमली पदार्थ ही व्यक्ती कुठे घेऊन जाण्याच्या प्रयत्नात होती, याचा तपास एनसीबी करीत आहे.

Exit mobile version