दुबईला निघालेल्या एका भारतीय कुटुंबायाच्या सामानाच्या झडतीत सीमा शुल्क विभागाला साडी आणि बुटात दडवून ठेवलेले ४ लाख ९७ हजार अमेरिकन डॉलर्स सापडले. या डॉलर्सची भारतीय चलनात ४ कोटी १० लाख किंमत असून सीमा शुल्क विभागाने याप्रकरणी गुन्हा दाखल करून तिघाना अटक केली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी बुधवारी ही कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई विमानतळावरून दुबई येथे निघालेल्या एकाच कुटुंबातील तीन भारतीय नागरिकांच्या सामानाची तपासणी सुरू असताना सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्यावर संशय येताच त्यांच्या सामानाची झडती घेण्यात येत असताना त्यांच्या बॅगेत घडी करून ठेवलेल्या कपड्यापैकी साडी वजनदार असल्याचे सीमा शुल्क विभागाच्या अधिकऱ्याच्या लक्षात आले. त्यांनी एकेक करून साडीची घडी मोडली असता त्यात अमेरिकन देशातील चलनातील डॉलर्स मिळून आले, त्याच बरोबर लहान मुलाच्या बुटाच्या आत मध्ये मोठया प्रमाणात डॉलर्स मिळून आले आहे.
हे ही वाचा:
चित्रा वाघ भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी
‘सामना’च्या पहिल्या पानावरील जाहिरातीमुळे भगवंत मान आठवले
ड्रग तस्करितून मिळविले कोटी रुपये ; जप्त झाली संपत्ती
देशाच्या विविध भागात स्फोट घडवण्याची होती दहशतवाद्याची योजना
सीमा शुल्क विभागाने साडीच्या घडीतून आणि बुटाच्या आतील भागातून सुमारे ४ लाख ९७ हजार अमेरिकन डॉलर्स जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेले अमेरिकन डॉलर्सची भारतीय चलनात ४ कोटी १०लाख एवढी किंमत आहे. बुधवारी करण्यात आलेल्या या कारवाईत सीमाशुल्क विभागाने एकाच कुटुंबातील दोन ज्येष्ठ नागरिकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली असून तिघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाने दिली आहे.