परकीय चलन हस्तांतरण व्यावसायिकाची २५ हजार डॉलरना फसवणूक

चित्रपट दिग्दर्शक असल्याची बतावणी करत केली लूट

परकीय चलन हस्तांतरण व्यावसायिकाची २५ हजार डॉलरना फसवणूक

फिल्म डायरेक्शन व्यवसायात असल्याची बतावणी करत एका ठगाने फॉरेन करन्सी एक्सचेंज व्यावसायिकाकडून २५ हजार अमेरिकन डॉलर घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार मंगळवारी सांताक्रूझमधील हॉटेल ग्रँड हयातमध्ये घडला. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन वाकोला पोलीस अधिक तपास करत आहेत.

विलेपार्ले पूर्वेकडील चित्तरंजन रोड परिसरात राहात असलेल्या ४४ वर्षीय तक्रारदार यांचा विदेशी चलन बदलून देण्याचा (फॉरेन करन्सी एक्सचेंज) व्यवसाय आहे. दिल्लीमधील एक ट्रॅव्हलींग व्यावसायिकाने त्यांच्या ओळखीच्या गौरव गोस्वामी नावाच्या दिल्ली येथे टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला फॉरेन करन्सी एक्सचेंज संदर्भात मदत पाहिजे असल्याचे सांगितले.

तक्रारदार यांनी गोस्वामी याला संपर्क साधला असता त्याने २५ हजार अमेरिकन डॉलरची आवश्यकता असल्याचे सांगुन मुंबईत आल्यावर त्याचे पैसे देईन असे सांगितले. गोस्वामी हा तक्रारदार यांच्याशी फोन कॉल्स आणि व्हॉटस्अपच्या माध्यमातून संपर्कात होता. पुढे त्याने त्याच्या ओळखीचा व्यक्ती मोठा व्यक्ती असल्याचे सांगून त्याला हे डॉलर्स हवे आहेत. तो डॉलर घेण्यासाठी सांताक्रूझ पूर्वेच्या हॉटेल ग्रँड हयातमध्ये येणार असल्याचे सांगितले.

तक्रारदार यांनी त्याला फॉरेन करंन्सी घेण्यासाठी पासपोर्ट, तिकीट, व्हीसा आणि पॅनकार्डची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. त्यावर गोस्वामी याने हॉटेलमध्ये बैठकीला आल्यानंतर तो व्यक्ती सर्व कागदपत्रे देईल असे सांगितले. पुढे गोस्वामी याने कृष्णन नावाच्या व्यक्तीचा मोबाईलनंबर तक्रारदार यांना पाठवत तो मंगळवारी दुपारी हॉटेल ग्रँड हयातमध्ये येणार असल्याचे सांगितले.

हे ही वाचा:

विधानसभेत विरोधकांवर मुख्यमंत्री शिंदेंची जोरदार टोलेबाजी

गुन्हे दाखल असूनही शेख शहाजहान नेहमीच सहीसलामत

कर्नाटकात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या; फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट

रामलल्लाची मूर्ती कठीण कसोटीतून साकारली

गोस्वामी याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन डॉलर घेऊन तक्रारदार हे पत्नीला सोबत घेऊन कृष्णन याला भेटण्यासाठी हॉटेल ग्रँड हयातमध्ये गेले. हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरील खोलीमध्ये कृष्णन नाव सांगणारा व्यक्ती त्यांना भेटला. त्याने तो पुर्वी इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करत होता आणि आता चित्रपट दिग्दर्शन व्यवसायात आल्याचे सांगितले. तसेच, त्याने हॉटेलच्या लॉबीमध्ये अभिनेता अक्षय कुमार याची शुटींग चालू असल्याने येथे भेटायला बोलावल्याची बतावणी केली.

फॉरेन करंन्सीची त्याला वरचेवर आवश्यकता भासत असून आता ओळख झाल्याने खुप फायदा होईल असे सांगत तक्रारदार यांच्याकडून २५ हजार डॉलर घेतले. अकाऊंटंट पैसे मोजण्यास येईल तेव्हा आवश्यक असलेली कागदपत्रे तो देईल असे सांगितले. पुढे, अकाऊंटंटशी बोलत असल्याचे भासवत कृष्णन नावाचा तो व्यक्ती डॉलरची रक्कम असलेली बॅग घेऊन तेथून निघून गेला. सर्वत्र शोध घेऊनही तो न सापडल्याने तक्रारदार यांनी वाकोला पोलीस ठाणे गाठून फसवणूकीची तक्रार दिली आहे.

Exit mobile version