मुंबई महापालिकेत नुकताच एक धक्कादायक प्रकार उघड झालेला आहे. मृत भावाच्या नावावर महापालिकेत ६ वर्षे नोकरी केल्याच प्रकार उघडकीस आला असून, ११ वर्षांपूर्वी मृत झालेल्या भावाच्या नावाची आणि बनावट कागदपत्रे बनवून पालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी केली. बुलढाणा पोलीस सदर इसमाला एका प्रकरणात ताब्यात घेण्यासाठी आले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे.
२०१४ साली दिनेश पेरे याची निवड भांडुप संकुल येथे सुरक्षा रक्षक म्हणून झाली होती. गेल्यावर्षी डिसेंबर मध्ये काही प्रकरणात या व्यक्तीची चौकशी बुलढाणा पोलिसांनी सुरू केली तेव्हा तो गायब झाला होता. मग पालिकेने पोलिसांकडे चौकशी करताच तो दिनेश नसून मंगेश पेरे असल्याचं उघड झाल आहे. दिनेश पेरे याचा मृत्यू २००९ मध्ये झाला असून मंगेश यांनी खोटी कागदपत्रे जोडून नोकरी मिळवली असल्याती माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पालिकेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे.
२०१४ मध्ये दिनेश पेरे याची निवड भांडुप संकुल येथे सुरक्षा रक्षक म्हणून झाली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात एका प्रकरणात बुलडाणा पोलिसांनी त्याची चौकशी सुरु केली, तेव्हा तो गायब झाला. त्यावेळी पालिकेने पोलिसांकडे चौकशी करताच तो दिनेश नसून मंगेश पेरे असल्याचं उघड झालं.
हे ही वाचा:
दिलासादायक!!! देशातील कोरोना रुग्णांची संख्या घटतेय!
गृह खात्याचे उपसचिव कैलास गायकवाड ईडीसमोर जाणार?
‘खासगी रुग्णालयांनी केली कोरोना रुग्णांची सर्वाधिक लूट’
खळबळजनक! मुंबईच्या केईएममध्ये एमबीबीएसच्या २९ विद्यार्थ्यांना कोरोना
दिनेश पेरे याचा मृत्यू २००९ मध्ये झाला असून मंगेश पेरेने खोटी कागदपत्रे जोडून नोकरी मिळवल्याचं समोर आलं. ११ वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या भावाच्या नावाचा आणि बनावट कागदपत्रांचा वापर करुन मंगेशने पालिकेत सुरक्षारक्षक म्हणून नोकरी केल्याचं उघडकीस आलं. या प्रकरणी पालिकेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे.