उधमपूरमध्ये पूल कोसळून ८० पेक्षा जास्त जखमी

संगम येथे बैसाखी उत्सवादरम्यान हा अपघात झाला

उधमपूरमध्ये पूल कोसळून ८० पेक्षा जास्त जखमी

जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात पूल कोसळल्याने अनेक लहान मुलांसह किमान ८० पेक्षा जास्त जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. चेनानी ब्लॉकमधील बैन गावातील बेनी संगम येथे बैसाखी उत्सवादरम्यान हा अपघात झाला.

दुर्घटना घडली त्यावेळी या पुलावर अनेक लोक होते. या लोकांचा भर सहन ना झाल्याने हा पूल भराने तुटला. सुदैवाने या अपघातात कोणालाही जीव गमवावा लागलेला नाही. अपघातात ८० ते ८५ जण जखमी झाले आहेत. २० ते २५ जण गंभीर जखमी आहेत. सहा ते सात जणांना जिल्हा रुग्णालयात रेफर केले आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे असे चेनानी नगरपालिकेचे अध्यक्ष माणिक गुप्ता यांनी सांगितले. पोलीस आणि इतर पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. पोलीस आणि मदत पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले आहे.

जखमींना चेनानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानुसार चार जखमींना उधमपूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे अधिका-यांनी सांगितले. उधमपूरच्या बैन गावात बैसाखीनिमित्त जत्रेचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये लोक मोठ्या संख्येने सहभागी होतात. यावेळीही जत्रेत मोठी गर्दी झाली होती. यादरम्यान पुलावर जास्त लोक चढल्याने हा अपघात झाला. हा फूटब्रिज परिसरातील नागरिकांनी पैसे जमा करून बांधल्याचा दावा केला जात आहे.

हे ही वाचा:

अमित शहा आज मुंबईत येणार, पोलिसांचे सतर्कतेचे आदेश

…म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती सावरकरांची स्तुती!

ठाणे – बोरिवली प्रवासाचा वेळ वाचणार, दुहेरी बोगदा बांधकामाला मिळणार वेग

जगनमोहन रेड्डी यांचे पोस्टर फाडणाऱ्या कुत्र्याची केली तक्रार

या दुर्घटनेनंतर गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेची आठवण करून दिली आहे. गुजरातमधील मोरबी येथे संध्याकाळी सडे सहाच्या सुमारास केबल झुलता पूल कोसळल्याने सुमारे ४००लोक मच्छू नदीत पडले. या अपघातात ९१ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात ५० पेक्षा जास्त महिलांचा मृत्यू आणि लहान मुलांसह ७० हून अधिक जण जखमी झाले होते.

Exit mobile version