चंद्रपूर येथील बल्लारशाह रेल्वे स्थानकावर दुर्घटना घडली आहे. या रेल्वे स्थानकावरील फूट ओव्हर ब्रिजचा स्लॅब अचानक कोसळला आहे. हि घटना रविवारी संध्यकाळी घडली आहे. अपघातादरम्यान अनेक प्रवासी सुमारे ६० फूट उंचीवरून पुलावरून रुळावर पडले. या घटनेत सुमारे १०-१५ जण प्रवासी जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे . काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघात घडला त्यावेळी अनेक प्रवासी या पुलावर होते. पण अचानक स्लॅब कोसळल्याने ते खाली पडले. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. घटनास्थळी बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे.
संध्याकाळी ही घटना घडली त्यावेळी काझीपेठ- पुणे एक्सप्रेस गाडी येणार होती. ही गाडी पकडण्यासाठी अनेक प्रवासी पहिल्या क्रमांकाच्या फलाटावरून दुसऱ्या क्रमांकाच्या फलाटावर जात होते. त्याच वेळी हा स्लॅब कोसळला आणि प्रवासी रुळांवर पडले. त्यावेळी स्थानकावरील प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत रुळावर पडलेल्या प्रवाशांसाठी बचाव कार्य सुरु केले.
हे ही वाचा :
सोमालियाच्या लष्कराचा बॉम्ब हल्ला, १०० दहशतवाद्यांचा खात्मा
‘पोलिस’ निघाले चोर; २२ लाख लुटले
‘आदित्येंच्या वयापेक्षा जास्त वर्ष शिवसेनेत आम्ही काम केलंय’
आसाममध्ये होणार महाराष्ट्र भवन, मुख्यमंत्र्यांची घोषणा
दरम्यान शुक्रवारी औरंगाबादजवळील लासूर रेल्वे स्थानकाजवळ दोन गाड्या एकाच रुळावर येण्याची घटना घडली होती . जालना नगरसूल डेमो पॅसेंजर आणि रेल्वेच्या विद्युतीकरणाची गाडी एकाच रुळावर आल्या होत्या. दोन्ही गाड्यांमध्ये दोन ते तीन फुटाचे अंतर होते. सुदैवाने गाडीचा वेग कमी असल्याने ती रेल्वे चालकाने अगोदरच थांबवली. त्यामुळे मोठं अपघात टाळला. यात कोणाची चुकी होती याची चौकशी रेल्वे विभागाकडून करण्यात येत आहे