लष्कर-ए-तोयबाच्या आदिल पर्रेसह २४ तासांत पाच दहशतवादी ठार

लष्कर-ए-तोयबाच्या आदिल पर्रेसह २४ तासांत पाच दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मोठं यश मिळालं आहे. काश्मीरमध्ये गेल्या २४ तासांत पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला आणि पोलिसांना यश मिळालं आहे. लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आदिल पर्रे याचा खात्मा करण्यात यश मिळालं आहे.

नुकत्याच झालेल्या दोन पोलिसांच्या हत्येमध्ये सामील असलेला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आदिल पर्रे याला ठार करण्यात आलं आहे. रविवार, १२ जून रोजी पोलिसांच्या पथकासोबत अचानक झालेल्या चकमकीत त्याचा खात्मा करण्यात आला. क्रिस्बल पालपोरा संगम परिसरात ही चकमक झाली. विशेष म्हणजे काश्मीरमध्ये गेल्या २४ तासांत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या पाचवर गेली आहे.

काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की, “गंदरबलचा लष्कराचा दहशतवादी आदिल पर्रे एका लहान पोलिस दलाशी अचानक झालेल्या चकमकीत मारला गेला. त्याचा जी.एच.हसन दर आणि सैफुल्ला कादरी यांच्या हत्येमध्ये सहभाग होता.

दरम्यान काल पुलवामामध्ये सुरक्षा दलाला तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं होत. हे तीनही दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे असल्याची माहिती आहे. जुनैद, फाजिल अहमद भट आणि इरफान अहमद मलिक अशी या तिघांची नावे होती. काश्मीरमधील पोलीस, सुरक्षा दलांवर हल्ले आणि इतर हिंसक घटनांमध्ये हे दहशतवादी सहभागी होते, अशी माहिती मिळाली आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांकडून हत्यारं आणि दारु गोळा जप्त करण्यात आला होता.

हे ही वाचा:

मूसेवाला हत्येप्रकरणी संतोष जाधवच्या आवळल्या मुसक्या

नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ नेपाळमध्ये एकत्र आले हिंदू

शिवसेनेऐवजी राष्ट्रवादीचा उमेदवार असता तर निवडून आला असता!

भारताच्या अर्थव्यवस्थेचे आणि पंतप्रधान मोदींचे अमेरिकेकडून कौतुक

आदिल पर्रेच्या मृत्यूने गेल्या २४ तासांत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या पाचवर गेली आहे तर यावर्षी खोऱ्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या १०० वर पोहचली आहे.

Exit mobile version