जम्मू- काश्मीर पोलिसांनी राज्यातील बडगाम जिल्ह्यातून पाच जिहादी दहशतवाद्यांना अटक केली आहे. तसेच त्यांच्या ताब्यातून आक्षेपार्ह साहित्यही जप्त करण्यात आले आहे. यासंदर्भातील माहितीनुसार, जम्मू- काश्मीर पोलिसांनी सुरक्षा दलांसह या पाच दहशतवादी साथीदारांना अटक केली आहे. हे दहशतवादी प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर- ए- तोयबाशी संबंधित आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आणि सैन्याने मिळून बडगाम जिल्ह्यातील खग परिसरात पाच दहशतवाद्यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रऊफ अहमद वानी, अब्दुल मजीद वाणी, हिलाल अहमद मलिक, गुलाम हसन मलिक, तौफिक अहमद दार आणि नजीर अहमद दार अशी त्यांची नावे आहेत. नवरोज बाबा खग, दानिश अहमद दार. मंजूर अहमद दार दार मोहल्ला नवरोज बाबा खग आणि शौकत अली दार, अली मोहम्मद दार, बाठीपोरा खग हे प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर- ए- तोयबाशी संबंधित आहेत.
हे ही वाचा:
हिमाचल प्रदेशात १० हजारांहून अधिक पर्यटक अडकले
पश्चिम बंगाल निवडणुकीत उमेदवारांचे कारनामे; मतपत्रिका चावल्या; तलावात उडी
आणखी एका चित्त्याचा कुनो राष्ट्रीय अभयारण्यात मृत्यू
उद्धव ठाकरेंनी लोकांना वेळ दिला नाही, ठाकरे गटात संवादाचा अभाव
दरम्यान, त्यांच्याकडून आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. जप्त केलेले सर्व साहित्य पुढील तपासासाठी जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी या दहशतवाद्यांविरोधात खग पोलिस ठाण्यात कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. लष्कर- ए- तोयबा ही दहशतवादी संघटना आहे, तिचा प्रमुख हाफिज मुहम्मद सईद आहे. सध्या तो लाहोरमधून ही संघटना चालवतो. ही संघटना पाकव्याप्त पीओकेमध्ये अनेक दहशतवादी तळ चालवते.