मुंबई पुण्यासह पडघ्यातुन पाच संशयिताना अटक, एनआयए ची कारवाई

मुंबई, ठाणे आणि पुण्यात छापे टाकून पाच संशयितांना अटक

मुंबई पुण्यासह पडघ्यातुन पाच संशयिताना अटक, एनआयए ची कारवाई

मुंबईसह पडघा आणि पुणे येथील पाच ठिकाणी एनआयए च्या पथकाने छापेमारी करून पाच संशयितांना अटक केली आहे. मुंबईत दोन ठिकाणी पडघ्यात दोन ठिकाणी आणि पुण्यात एक ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमारी दरम्यान एनआयए च्या हाती काही आक्षेपार्ह कागदपत्रे लागली असून अटक करण्यात आलेले संशयित हे ‘इसिस’ या दशतवादी संघटनेच्या संपर्कात होते अशी माहिती समोर आली आहे. एनआयए च्या कारवाई नंतर मुंबई पोलीस आणि राज्य एटीएस सतर्क झाले असून मुंबईसह राज्यात संशयितावर लक्ष केंद्रित केले आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सोमवारी पहाटेपासून मुंबई, ठाणे आणि पुण्यात छापे टाकून पाच संशयितांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले पाच ही जण ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया'(इसिस) या दहशतवादी संघटनेतील दहशतवाद्याच्या संपर्कात होते असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईतील नागपाडा येथे दोन ठिकाणी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील पडघा गाव येथे दोन ठिकाणी आणि पुण्यात एक ठिकाणी छापेमारी करून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.या संदर्भात एनआयएन ने २८ जुन रोजी गुन्हा दाखल करून तपास सुरू करून संशयितांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात आले होते.

हे ही वाचा:

फुटबॉलच्या चार मैदानांच्या आकाराएवढे जहाज अदानींच्या मुंद्रा बंदरावर

खासदार अमोल कोल्हेंचा यु टर्न; शरद पवारांसोबत असल्याचे ट्वीट

विरोधकांची बेंगळुरू बैठक पुढे ढकलली! राष्ट्रवादीतील फूट हे कारण?

‘कोणतीही अनियमितता नाही; पालिकेच्या मुदतठेवी वाढत आहेत’

दरम्यान ताबीज याला मुंबईतील नागपाडा येथून सोमवारी पहाटे अटक करण्यात आली, ताबीज हा इसिस या संघटनेतील अमीर नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होता, तसेच ताबीज याने ‘व्हाईस ऑफ हिंद’ या इसिस च्या मासिकेत लेख सुद्धा लिहले होते अशी माहिती सूत्रांनी दिली. ताबीज हा राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या नागपाडा येथील मुख्य कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर राहण्यास होता,तेथूनच तो दहशतवादी संघटना इसिसच्या संपर्कात होता, व अतिरेकी कारवाया करीत असल्याचे समोर आलेअसले तरी याची पुसटशी कल्पना मुंबई पोलीस आणि एटीएसला नव्हती.

Exit mobile version