अमृतसरमधील सचखंड श्री हरमंदिर साहिबजवळ बुधवारी मध्यरात्री आणखी एक स्फोट झाला. अमृतसरमधील ही आतापर्यंतची तिसरी घटना असल्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पंजाब पोलिसांनी दिली आहे.
बुधवारी मध्यरात्री सुमारे १२ वाजून ४० मिनिटांनी सचखंड श्री हरमंदिर साहिबजवळ स्फोट झाला. हे ठिकाण पहिल्या दोन स्फोटांच्या विरुद्ध दिशेला आहे. या स्फोटात कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झालेली नाही. स्फोटाची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.
Amritsar low-intensity explosion cases solved; 5 persons arrested. A press conference will be held in Amritsar: DGP Punjab police, Gaurav Yadav pic.twitter.com/0ByENidTXc
— ANI (@ANI) May 11, 2023
त्यानंतर या बॉम्ब स्फोटाचा कट रचणाऱ्या पाच सूत्रधारांना अटक करण्यात आली आहे. डीजीपी गौरव यादव यांनी ट्विटरवर यासंबंधी माहिती दिली आहे. अमृतसरमधील कमी तीव्रतेच्या स्फोट प्रकरणांची उकल झाली असून पाच जणांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी ट्विट करून सांगितले आहे. शहरातील शांतता भंग व्हावी हा स्फोटामागील हेतू असल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा:
अदानींवरील हिंडेनबर्गच्या आरोपांच्या ठिकऱ्या; मॉरिशसच्या मंत्र्यांचे स्पष्टीकरण
इम्रान खान यांना आठ दिवसांची एनबी कोठडी
इस्लाम कबूल न केल्यामुळे पत्नीची केली हत्या
राज्यात होणार ३०,००० शिक्षकांची मेगा भरती !
यापूर्वी शनिवारी उशिरा रात्री आणि सोमवारी सकाळी हेरिटेज स्ट्रीटवरील सारागढी सरा ठिकाणाजवळ स्फोट झाले होते. या दोन्ही स्फोटांचा पंजाब पोलिस आणि फॉरेन्सिक पथक तपास करत आहे. त्यांचा अहवाल अद्याप मिळालेला नाही.