बांगलादेशातील पाच बेकायदेशीर स्थलांतरितांना दिल्लीतून अटक

बांगलादेशचे नागरिकत्व पुरावा आणि मोबाईल फोन नंबर सापडल्याची माहिती

बांगलादेशातील पाच बेकायदेशीर स्थलांतरितांना दिल्लीतून अटक

देशभरात बांगलादेशी रोहिग्यांविरोधातील मोहीम तीव्र करण्यात आली असून बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना शोधून त्यांना माघारी पाठवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अशातच दिल्ली पोलिसांनी पाच बांगलादेशी स्थलांतरितांना अटक केली आहे. चौकशी दरम्यान त्यांनी बांगलादेशातून बेकायदेशीरपणे स्थलांतर केल्याची कबुली दिली आहे.

दिल्ली पोलिसांनी बांगलादेशातील पाच बेकायदेशीर स्थलांतरितांना काली बस्ती, उत्तम नगर मेट्रो स्टेशनजवळ, पीएस उत्तम नगरच्या हद्दीत अटक केली. वृत्तसंस्था एएनआयने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. या पाचही जणांची चौकशी केली असता, त्यांनी बांगलादेशातून बेकायदेशीरपणे स्थलांतर केल्याची कबुली दिली. याशिवाय पुढील तपासात त्यांचे बांगलादेशचे नागरिकत्व आणि मोबाईल फोन नंबर उघड झाले आहेत आणि त्यांनी त्यांच्या राष्ट्रीयत्वाची पुष्टी केली आहे. अटक केलेल्या व्यक्तींना आरके पुरम येथील फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिसच्या (FRRO) कार्यालयात नेण्यात आले. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांना इंद्रलोक केंद्रात ताब्यात घेण्यात आले.

यापूर्वी, राजधानीमध्ये दिल्ली पोलिसांनी एका मोठ्या बेकायदेशीर इमिग्रेशन रॅकेटचा पर्दाफार्श केला होता. तसेच या प्रकरणी ११ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. बनावट वेबसाइट तयार करणे, बनावट कागदपत्रे आणि बनावट आधार कार्ड बनवणे अशी कामे करणारे आणि तंत्रज्ञान तज्ञांचा या अटक केलेल्यांमध्ये समावेश होता. हे लोक बांगलादेशी नागरिकांना बनावट वेबसाइटद्वारे बनावट आयडी वापरून सुविधा देत होते. आरोपींनी बनावट वेबसाइटद्वारे बनावट आधार, मतदार ओळखपत्र आणि बनावट ओळखपत्र वापरून तयार केलेल्या इतर कागदपत्रांचा वापर केला होता.

हे ही वाचा : 

डीएमके मंत्री दुराई मुरुगन यांच्या निवासस्थानावर ईडीकडून ११ तास छापेमारी

धक्कादायक! बस्तरमधील १२० कोटींचा घोटाळा उघड करणाऱ्या पत्रकाराची हत्या

आजपासून १५ वी लक्ष्य कप नेमबाजी स्पर्धा

सिडनी कसोटीत न खेळणाऱ्या रोहित शर्माने अखेर घेतला निर्णय!

दरम्यान, दिल्लीच्या उपराज्यपालांनी मुख्य सचिव आणि पोलिस आयुक्तांना दिल्लीत राहणाऱ्या बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी दोन महिन्यांची विशेष मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, पोलिसांनी सांगितले आहे की, आतापर्यंत शहरात एक हजारहून अधिक बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांची ओळख पटली आहे. पोलिसांच्या या मोहिमेमध्ये संशयितांच्या घरोघरी जाऊन त्यांची पडताळणी, कागदपत्रांची छाननी आणि चौकशीचा याचा समावेश आहे.

Exit mobile version