गुरुग्राम पोलिसांनी गो तस्करी करणाऱ्या एक रॅकेट उघडकीस आणले तसेच अशी तस्करी करणाऱ्यांचा फिल्मी स्टाइलने पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या.
यासंदर्भातील एक व्हीडिओ व्हायरल झाला असून त्यात गुरुग्राम पोलिस या गो तस्करांचा आपल्या गाडीने पाठलाग करत असल्याचे दिसत आहे. पडदा लावलेल्या एका टेम्पोमधून हे गो तस्कर गाईंना पळवून नेत आहेत आणि त्यांच्या मागे गुरुग्राम पोलिसांच्या गाड्या लागल्या आहेत. पण पोलिसांना कुठेतरी अडथळा व्हावा आणि पोलिसांच्या गाड्यांचा वेग कमी व्हावा किंवा त्या गाड्या उलट्या व्हाव्यात यासाठी या तस्करांनी गाडीतील गाईंनाच बाहेर फेकण्याचा प्रकार केला. पण पोलिसांनी सावधगिरी बाळगत हा पाठलाग सुरूच ठेवला. नंतर या गाडीला पकडून त्यांनी त्यातून बल्लू, तस्लीम, पापा, शहीर आणि खालिद यांना अटक केली आहे. गुरुग्राम पोलिसांनी तब्बल २२ किमी या तस्करांचा पाठलाग केला आणि त्यांना जेरबंद केले.
फिल्मी स्टाइल से pic.twitter.com/CPsa6WN3tC
— घासीराम रेबारी (@Rebaribjp) April 10, 2022
गोमांसास प्रतिबंध लावलेला असतानाही अशा प्रकारची तस्करी अनेक ठिकाणी होत असते. गो तस्करीला आळा घालण्यासाठी काही स्वंयसेवकही पोलिसांना याची माहिती देत असतात. हिंदुत्ववादी संघटनाही यादृष्टीने काम करून अशा तस्करीला रोखण्याचा प्रयत्न करत असतात. या घटनेत पोलिसांनीच कारवाई करत तस्करांचा पर्दाफाश केला आणि त्यांना जेरबंद केले. विविध राज्यांतून अशा गाई छुप्या मार्गाने आणायच्या आणि त्या कत्तलखान्यात घेऊन जायच्या हा या तस्करांचा उद्योग आहे.
हे ही वाचा:
हिमाचलमध्ये ‘आप’ला धक्का, प्रदेशाध्यक्षांसह तीन बडे नेते भाजपात
‘श्रीरामांच्या आचार-विचारांचा जीवनात सर्वांनी अंगीकार करायला हवा’
पृथ्वीराजच्या रूपात कोल्हापूरला मिळाली २१ वर्षांनी महाराष्ट्र केसरीची गदा
मनसेने थेट शिवसेना भवनाबाहेर लावली हनुमान चालीसा
या फिल्मी स्टाइलने केलेल्या पाठलागामुळे या तस्करांवर जरब बसविण्यात मात्र पोलिसांना यश आले आहे.