मिरारोडमध्ये बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. मिरारोड आणि नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनाधिकृतरित्या वास्तव्य करत असलेल्या बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी पाच बांगलादेशी महिला नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर पथकाने ही कारवाई केली आहे.
मिरारोड आणि नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एव्हरशाईन वुड बिल्डींगच्या पाठीमागील झोपडपट्टी, बेवर्ली पार्करोड तसेच न्यु मिरा पॅराडाईस बिल्डींगच्या पाठीमागील झोपडपट्टी, गितानगर या ठिकाणी बांगलादेशी नागरिक वास्तव्यास आहेत. तसेच जैन मंदीर, अंबर स्वीट मार्ट जवळ मिरारोड पूर्व या ठिकाणी कामासाठी बांगलादेशी नागरिक येत असल्याची आणि ते विनापरवाना राहत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस पथक, पंच यांच्यासह सापळा रचण्यात आला होता.
दरम्यान, या कारवाईत एव्हरशाईन वुड बिल्डींगच्या पाठीमागील झोपडपट्टी, बेवर्ली पार्क या ठिकाणी दोन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले. तर, न्यु मिरा पॅराडाईस बिल्डींगच्या पाठीमागील झोपडपट्टी, गितानगर तसेच जैन मंदीर, अंबर स्वीट मार्टजवळून तीन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले.
हे ही वाचा..
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी एसआयटी स्थापन
संतप्त बदलापूरकरांकडून शाळेची तोडफोड; रेल्वे स्थानकात पोलिसांवर केली दगडफेक
कासीम पठाणच्या छळास कंटाळून तरुणीची आत्महत्या
कोलकाता पीडितेचा मृतदेह पालकांकडे देण्यास वेळ का लागला?
या कारवाईदरम्यान, एकूण पाच बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. महिलांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्या बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली त्यांनी दिली. या महिलांना ताब्यात घेऊन बांगलादेशी नागरीकांविरुध्द मिरारोड आणि नयानगर पोलीस ठाण्यात विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.