एक हजार लिटर भेसळयुक्त दूध सापडले; पाच जणांना केली अटक

नामांकित कंपन्यांच्या रिकाम्या पिशव्या वापरत होते

एक हजार लिटर भेसळयुक्त दूध सापडले; पाच जणांना केली अटक

कांदिवली पूर्व पॊयसर या ठिकाणी गुन्हे नियंत्रण पथक आणि अन्न व औषध पुरवठा विभागाने संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत १ हजार ४० लिटर भेसळयुक्त दूध जप्त केले आहे, याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात अली असून त्यात एका महिलेचा समावेश आहे.

ही कारवाई बुधवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली असून पोलिसांनी जप्त केलेले दुधात गोकुळ आणि अमूल या नामांकित कंपनीचे दूध असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रोशैया (४९), श्रीनिवास नरसिंग वडला कोंड (३८), नरेश मरैया जडला (२९), अंजय्या गोपालू बोडुपल्ली (४३) आणि रामा सत्यनारायण गज्जी (३०) असे अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत.

कांदिवली पूर्वेतील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या बिहारी टेकडी या सोसायटीतील एका घरात मोठ्या प्रमाणात दुधाची भेसळ सुरु असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे नियंत्रण ब्युरोचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अन्न व औषध पुरवठा विभागाला(एफडीए) सोबत बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास गुन्हे नियंत्रण ब्युरोच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला असता एक महिला आणि तीन पुरुष एका खोलीत दुधात भेसळ करून भेसळयुक्त दूध पुन्हा पिशवीत भरून त्यांना सील करीत होते.

हे ही वाचा:

एटीएम मधून रोकड काढत आहात थांबा ?

ब्राह्मण म्हणून लक्ष्य केल्याने शालेय आहार बनविण्यास दिला नकार

विशिष्ट जातीधर्माच्या लोकांवर कारवाई केली जात आहे…मुश्रीफांचा गंभीर आरोप

बच्चू कडू यांना मोटरसायकलची धडक

पोलिसांनी या महिलेसह तिघांना ताब्यात घेऊन सुमारे १ हजार ४० लिटर दूध जप्त करण्यात आले आहे त्याच बरोबर भेसळ करण्यासाठी लागणारे साहित्य, अमूल , गोकुळ कंपनीच्या रिकाम्या आणि भरलेल्या पिशव्या आणि दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी, आणि रासायनिक द्रव्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार हा भेसळीचा धंदा मागील वर्षभरापासून कांदिवली परिसरात सुरु होता, या भेसळयुक्त दुधाची विक्री झोपटपट्टी, हॉटेल आणि चहा विक्रेत्यांना करण्यात येत होती.

Exit mobile version