इस्लामिक शिक्षणाच्या नावाखाली लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना रोज समोर येत आहेत. आता इस्लामिक देश मलेशियामधील चैरिटी होम्समध्ये लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली आहे. मलेशियाच्या पोलिसांनी दोन राज्यांतील २० चैरिटी होम्सवर (इस्लामिक धर्मादाय गृह) छापे टाकून मुलांच्या लैंगिक शोषणाचा पर्दाफाश केला आहे. या छाप्यादरम्यान पोलिसांनी २०१ मुलींसह ४०० मुलांची सुटका केली आहे.
यासोबतच पोलिसांनी मौलवींसह १७१ जणांना अटक केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, या इस्लामिक चैरिटी होम्समध्ये मुलांवर बलात्कार, अत्याचार आणि विनयभंग होत असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. रिपोर्ट्सनुसार, या चैरिटी होम्समध्येमध्ये राहणाऱ्या मुलांवर यापूर्वी बलात्कार झाला होता. त्यानंतर त्यांना इतर मुलांवर बलात्कार करायला शिकविले जात होते. विरोध करणाऱ्यांवर अगदी ५ वर्षांपर्यंतच्या मुलांना गरम वस्तूंनी डाग दिले जात होते. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच छापे टाकण्यात आले. ११ सप्टेंबर रोजी, दोन वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुरू असलेल्या २० चैरिटी होम्सवर छापे टाकून ४०० मुलांची सुटका करण्यात आली .
हे ही वाचा :
संजौली मशिदीच्या विरोधात व्यापारीही उतरले, बाजारपेठा बंद !
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त अजमेर शरीफ दर्ग्याच्यावतीने ४ हजार किलो अन्नवितरण
प्रशिक्षणार्थी सैनिकाला बांधून मैत्रिणीवर बलात्कार?
हे चैरिटी होम्स ग्लोबल इखवान सर्व्हिसेस अँड बिझनेस (GISB) नावाच्या कंपनीद्वारे चालवली जात असल्याची माहिती आहे. ही मलेशियन कंपनी इस्लामिक व्यावसायिक गट असून सुपरमार्केट व्यवसायात गुंतलेली आहे. कंपनीचा व्यवसाय अनेक देशांमध्ये पसरलेला आहे. ही कंपनी बंदी घातलेल्या धार्मिक संघटनेशीही संबंधित असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, कंपनीने लैंगिक शोषणाचे वृत्त फेटाळले आहे. कंपनी कोणत्याही बेकायदेशीर कामात गुंतलेली नसून या समस्येचे निराकरण करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे.
मलेशियन पोलिस अधिकारी रझारुद्दीन हुसेन यांनी सांगितले की, या कारवाईदरम्यान मौलवी, वसतिगृह पर्यवेक्षक आणि संस्थांचे अध्यक्षांसह १७१ लोकांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांचे वय १७ ते ६४ दरम्यान आहे. यामध्ये ६६ पुरुष आणि १०५ महिलांचाही समावेश आहे.