27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाऐनवेळी गोळीचं सुटली नाही, मनसे पुणे जिल्हाध्यक्ष गोळीबारात बचावले

ऐनवेळी गोळीचं सुटली नाही, मनसे पुणे जिल्हाध्यक्ष गोळीबारात बचावले

खंडणीच्या हेतूने समीर थिगळे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

Google News Follow

Related

पुण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार झाला आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ माजली आहे. गुंडानी समीर ठिगळे यांच्या छातीवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यात ते सुदैवाने ते वाचल्याने मोठा अनर्थ टाळला आहे. हा गोळीबार ठिगळे यांच्या कुटुंबाबा देखत करण्यात आला. गुंडानी ठिगळे यांच्या राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील राहत्या घरासमोर हा गोळीबार केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुणे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

गुंडांनी गोळ्या झाडल्या ठेवा थिगळे यांचे कुटुंबीय ही गटना स्थळी होती. गुंडांनी समीर थिगळे यांच्या कुटुंबीयांसमोरच गोळीबार केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे. हा गोळीबार खंडणीच्या हेतूने करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मी खेडचा भाई आहे. एकाला घालवलाय. तुलाही माज आलाय संपवतोच तुला अशी धमकी देत गुंडानी पिस्तूल रोखत ठिगळे यांच्याकडे खंडणीची मागणी केली. त्यानंतर गुंडानी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. पण ऐनवेळी पिस्तुलातून गोळी सुटली नाही त्यामुळे पुढचा अनर्थ टाळला. ठिगळे गोळीबारात बचावले असले तरी मनसे जिल्हाध्यक्षावरच गोळीबार झाल्याने शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

हे ही वाचा:

क्रिकेटपटू उमेश यादवला ४४ लाखांचा गंडा

कोविड काळात रेमडेसीवीर औषधाचा काळाबाजार

श्याम मानव नावाचा भोंदू बाबा

राऊत यांनी अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाची निवडणुकही लढवावी

हा गोळीबार खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर असलेल्या आरोपीकडून खंडणी मागणी करण्यात आली. ठिगळे यांच्या हत्येचा प्रयत्न अपयशी ठरल्यावर गुंडानी हवेत गोळीबार करत घटनास्थळापासून पळ काढला . या गोळीबाराच्या घटनेनंतर ठिगळे कुटुंबीय भयभीत झाले आहे.

मिलिंद जगदाळे आणि मयूर जगदाळे यांच्या विरोधात प्राणघातक हल्ला करत शस्त्राचा वापर करून खंडणी मागितल्याचा गुन्हा प्रकरणी राजगुरुनगर पोलिसांत दाखल झाला आहे. आरोपी फरार झाला आहे. फरारी गुंडाचा राजगुरू नगर पोलीस शोध घेत आहेत. या गुंडांवर मोक्काचा आरोप असल्याचे पोलिसांनी सांगितले .

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा