मालेगावात माजी महापौरांवर गोळीबार

हल्ल्यात अब्दुल मलिक गंभीर जखमी; उपचार सुरू

मालेगावात माजी महापौरांवर गोळीबार

मालेगावमध्ये माजी महापौर अब्दुल मलिक युनुस यांच्यावर रविवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत अब्दुल मलिक हे गंभीर जखमी झाले असून त्यांना नाशिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका हॉटेलमध्ये ते चहा प्यायला थांबलेले असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. सध्या मालेगाव शहरात तणाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

एमआयएमचे अब्दुल मलिक हे महानगर अध्यक्ष आहेत. मलिक यांच्यावर जवळून तीन गोळ्या झाडण्यात आल्या. मध्यरात्रीच्या सुमारास मलिक हे मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गवरील एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबले होते. यावेळी तिथे मोटरसायकलवरून हल्लेखोर आले आणि जवळ जात त्यांच्यावर गोळीबार केला. मलिक यांना गोळ्या लागल्याचे दिसताच हे हल्लेखोर फरार झाले आहेत. मलिक यांच्या हात-पायाला आणि छातीजवळ गोळ्या लागल्या आहेत. या गोळीबारात मालिक हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर नाशिकला हलविण्यात आले. या गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

हे ही वाचा:

पुणे अपघात: वेदांतच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल करणाऱ्या ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक

पश्चिम बंगाल-ओडिशाच्या किनाऱ्यावर ‘रेमल चक्रीवादळ’ धडकण्याची शक्यता!

शिक्षिकेचा आवाज काढून सात विद्यार्थिनींवर बलात्कार

योगी आदित्यनाथ एकेकाची मस्ती उतरवण्यात वाकबगार आहेत!

या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, साहाय्यक पोलीस अधीक्षक तेगबिरसिंह संधू यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

Exit mobile version