जम्मू-काश्मीरमधील अखनूरमध्ये पुन्हा एकदा लष्कराच्या वाहनावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेनंतर परिसरात लष्कराची शोधमोहीम सुरू आहे. अखनूर सेक्टरमध्ये लष्कराच्या वाहनावर गोळीबार केल्यानंतर दहशतवादी पळून गेले. सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी पहाटे लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दरम्यान, तीन दहशतवादाचा खात्मा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
अखनूरमधील बटाल परिसरात सकाळी ७ वाजता तीन दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर गोळीबार केला. यानंतर दहशतवाद्यांनी पळ काढला असून सुरक्षा दलांनी तातडीने परिसराला वेढा घातला आहे. सध्या या भागात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवली जात आहे. यातच तीन दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ होत असल्याने सणासुदीच्या काळात सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी जम्मू भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अलीकडच्या काळात अनेक मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत.
हे ही वाचा:
सीमेपलीकडून होणारी घुसखोरी थांबेल तेव्हाच बंगालमध्ये शांतता नांदेल!
गुप्तांगात लपवून आणले १ किलो वजनी सोने, तपासणी करताच पितळ उघड!
वक्फ बोर्डाने शेतकऱ्यांच्या १२०० एकर जमिनीवर ठोकला दावा, शेतकरी म्हणाले, आम्ही जायचे कुठे?
वयाच्या ६ व्या वर्षी घडला गुन्हा, १७ वर्षाची झाल्यावर केली तक्रार ,४ तासात मौलवीला केले गजाआड!
यापूर्वी २४ ऑक्टोबर रोजी, बारामुल्लामधील गुलमर्गजवळ दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन सैनिक आणि दोन पोर्टर ठार झाले, तर वेगळ्या हल्ल्यात, त्रालमध्ये उत्तर प्रदेशातील एक तरुण जखमी झाला होता. तर, २० ऑक्टोबर रोजी, गांदरबल जिल्ह्यातील सोनमर्ग येथे एका बांधकाम साइटवर दहशतवाद्यांनी डॉक्टर आणि सहा स्थलांतरित कामगारांसह सात जणांची हत्या केली. या घटनेच्या दोन दिवसांपूर्वी बिहारमधील आणखी एका परप्रांतीय कामगारावर हल्ला झाला होता.