मुंबईतील गजबजलेल्या माझगावमध्ये गोळीबार

कोणतीही दुखापत नाही

मुंबईतील गजबजलेल्या माझगावमध्ये गोळीबार

मुंबईत एका ठिकाणी झालेल्या गोळीबारानंतर मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईतील गजबजलेल्या भागापैकी एक असलेल्या माझगाव परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री ३ वाजतच्या सुमारास ही घटना घडली. या गोळीबारात सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. गोळीबाराचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

माहितीनुसार, मध्यरात्री तीनच्या सुमारास हा गोळीबार झाला आहे. दहशत पसवण्यासाठी हा गोळीबार केला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला असून एक गोळी झाडल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबारादरम्यान गोळी टाळण्यासाठी धावत असलेल्या एका व्यक्तीला दुखापत झाली आहे. त्याला गोळी लागली नसून धावताना दगड लागल्याने दुखापत झाली आहे. जखमी व्यक्तीला उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीवर प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले आहे.

हे ही वाचा:

मोबाईल वर गेम खेळण्यास मना केल्याने मुलाची आत्महत्या

श्रीलंका सरकारकडून बीसीसीआय सचिव जय शहांची माफी

दिवाळीनंतरच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे महत्त्वाचे निर्णय

ललित पाटील प्रकरणी पुणे पोलीस दलातील दोन पोलीस कॉन्स्टेबल्सना अटक

दरम्यान पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात  भादंवि कलम 307 आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. माझगाव परिसर हा कायम गजबजलेला असतो. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहे.

Exit mobile version