दिवाळीच्या निमित्ताने सर्वत्र फटाक्यांचा धुमधडाका सुरु असताना गुरुग्राम मात्र खऱ्याखुऱ्या गोळीबाराने हादरून गेले आहे. घरात घुसून एकाच कुटुंबातील एक, दोन नाही तर तब्बल सहा जणांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. स्थानिक माजी सरपंचाच्या कुटुंबावर हा हल्ला केला गेला आहे. व्यक्तिगत वादातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या हल्ल्यात कुटुंबातील एका सदस्याचा मृत्यू झाला असून बाकीचे पाच सदस्य जखमी झाले आहेत. या जखमी सदस्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असणं त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. गुरुग्राममधील मानेसर परिसरातील कासन गावात ही घटना घडली आहे. या गावातील माजी सरपंचाच्या घरी लक्ष्मी पूजन सुरु होते. यावेळी रात्री साडे आठच्या सुमारास हे हल्लेखोर त्यांच्या घरात घुसले. घरात घुसून त्यांनी अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली.
हे ही वाचा:
चिमुरडीने का लिहिले सरन्यायाधीशांना पत्र?
चार धाम देवस्थान बोर्ड होणार बरखास्त?
महाराष्ट्रात कधी होणार पेट्रोल डिझेलच्या दरात घट?
वैय्यक्तिक वादातून करण्यात आलेल्या या हल्ल्यात घरातील निष्पाप लोक जखमी झाले तर या कुटुंबातील आठ वर्षांचा एक लहान मुलगा मृत्युमुखी पडला आहे. तर या घरातील पाळीव कुत्र्यालाही गोळी लागली आहे. गोळीबार करून हे हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. रिंकू नावाच्या एका युवकाने हा हल्ला घडवून आणल्याचे म्हटले जात आहे. २००७ साली रिंकूच्या कुटुंबातील एका व्यक्तीची हत्या झाली होती. त्याचाच सूड घेण्यासाठी रिंकूमार्फतही हल्ला घडवून आणला असल्याचे बोलले जात आहे. या आधीही रिंकूने अशा प्रकारचे तीन हल्ले केले असल्याचे सांगितले जाते.