अमली पदार्थ घेऊन भारतीय हद्दीत ड्रोन घुसले

अमृतसरच्या रानिया सीमेजवळ सुरक्षा दलाच्या पथकाने एक अनोळखी ड्रोन पाडले.

अमली पदार्थ घेऊन भारतीय हद्दीत ड्रोन घुसले

अमृतसरच्या रानिया सीमेजवळ सुरक्षा दलाच्या पथकाने एक अनोळखी ड्रोन पाडले. रविवार, १६ ऑक्टोबर रोजी भारतीय हवाई हद्दीत फिरणाऱ्या एका ड्रोनवर सुरक्षा दलाने गोळीबार केला. या ड्रोनचा वापर अमली पदार्थ पोहचवण्यासाठी होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रानिया सीमेजवळ भारतीय हवाई हद्दीत ड्रोन फिरत असल्याचे सुरक्षा रक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी ड्रोनवर गोळीबार केला. यावेळी हे ड्रोन पाडण्यात सुरक्षा दलाला यश आले. हा ड्रोन रविवारी रात्री ९.१५ च्या सुमारास सुरक्षा दलाच्या नजरेत पडला. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यावर गोळीबार करत त्याला जमिनीवर पाडण्यात यश मिळवले. हा ड्रोन पाकिस्तानमधून आल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सीमा सुरक्षा दलाने दिलेल्या माहितीनुसार, हा ड्रोन १२ किलो वजनाचा असून अमली पदार्थांची खेप पोहोचवण्यासाठी या ड्रोनचा वापर करण्यात येत होता.

हे ही वाचा

सुशांतसिंग राजपूतच्या मैत्रिणीच्या आत्महत्येचे कारण आले समोर

बाळासाहेबांच्या शिवसेनेतील ‘या’ आमदराकडून अंधेरी पोट निवडणुक बिनविरोध करण्याची मागणी

बोरिवली ते ठाणे प्रवास आता तासात नाही मिनिटांत

रुद्रांक्ष पाटीलचा ‘ऑलिम्पिक वेध’

गेल्या तीन दिवसांतली ही दुसरी घटना असून दोन दिवसांपूर्वी गुरुदासपूर सीमेजवळही अशाच प्रकारे एक ड्रोन पाडण्यात आला होता. पाकिस्तानी हवाई हद्दीतून भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका ड्रोनला गुरुदारपूर सीमेजवळ पाडण्यात आले होते. या ‘ड्रोन’ला एक दोरखंड लावलेला होता.

Exit mobile version