कुर्ल्यातील निवासी इमारतीला आग पण जीवितहानी नाही

अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यामुळे आग आटोक्यात

कुर्ल्यातील निवासी इमारतीला आग पण जीवितहानी नाही

टिळकनगर (कुर्ला ) येथील एका निवासी इमारतीला भीषण आग लागली आहे. अनेक लोक खिडक्यांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. आग कशी लागली याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही. न्यू टिळक नगर परिसरात आग लागल्याचे वृत्त आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे व्ह्यू इमारतीला आग लागली आहे. आग तातडीने इमारतीच्या काही मजल्यांवर पसरली. अग्निशमन दल येईपर्यंत आगीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न स्थानिकांनी केला. सध्या अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे काम करत आहेत.

हे ही वाचा:

या प्रकरणी सीबीआयकडून लालू यादवांसह १५ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

भुजबळांप्रमाणे चतुर्वेदी सीए याने ‘मातोश्री’ची कागदपत्रे व्हाईट करून घेतली

सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

मुंबईतल्या गोडाऊनमधून १०० कोटींचे एमडी जप्त

दुपारी ३.४५ च्या सुमारास आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. चेंबूर पूर्वेकडील लोकमान्य टिळक टर्मिनलजवळील न्यू टिळक नगर भागात ही आग लागली. १३ मजली इमारतीच्या बाराव्या मजल्यावर आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

अग्निशमन दलाचे जवान येण्यापूर्वीच आगीने भीषण रूप धारण केले होते. आकाशात धुराचे लोट दिसत होते. यादरम्यान आगीत अडकलेल्या महिलेला काही स्थानिक लोकांनी वाचवण्यात यश मिळविले. ज्या घरात आग लागली त्याच घरात ही महिला अडकल्याचे सांगण्यात येत आहे. खिडकीतून त्याची सुटका करण्यात आली. अनेकजण इमारतीत अडकले आहेत.अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.

Exit mobile version