गाझियाबादमध्ये एका झोपडपट्टीत आग लागली होती, ही आग एवढी भीषण होती की, वस्तीला लागून असलेल्या गोठ्यालाही आग लागली. या आगीत सुमारे ४० गायी जाळून खाक झाल्या आहेत.
गाझियाबादमधील इंदिरापुरम येथील कानवानी गावात ही आग लागली होती. ही आग एका झोपडपट्टीत लागली, जिथे कचऱ्याचे गोदामही होते आणि त्याच वस्तीला लागून असलेल्या गोठ्यात ही आग पसरली. दुपारची वेळ होती. ही आग इतकी वेगाने पसरली की सर्व गायी गोठ्यातून काढणे कठीण झाले आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने गायी जळून मरण पावल्या. तिथे गोठ्यात १०० गायी बांधल्या होत्या. त्यातील सुमारे ४० गायी जाळून खाक झाल्या आहेत.
सध्या गाझियाबाद पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याचबरोबर प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचेही सांगितले असून, ही झोपडपट्टी कोणत्या परिस्थितीत वसली आहे, याचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कारण वस्तीत राहणारे लोक रद्दी आणि भंगार विकण्याचे काम करतात, त्यामुळे ही आग लागली का याचा तपास सुरु आहे. या आगीत गव्हाचे शेतही जळून खाक झाले.
हे ही वाचा:
पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांना शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदींनी सुनावले खडे बोल
पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना!
गुणरत्न सदावर्ते यांच्या कोठडीत २ दिवसांची वाढ
नीरव मोदीचा सहकारी सुभाष शंकरला इजिप्तमध्ये पकडले
सोमवारी, ११ एप्रिलला दुपारी एकच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आणि अग्निशमन विभागाच्या सुमारे १५ गाड्यांच्या मदतीने आग विझवली. सुमारे एक तासाने ही आग नियंत्रणात आली. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, ही आग वस्तीला लागली आणि नंतर ही आग वस्तीला लागून असलेल्या गोठ्यात पसरली.