दिल्लीच्या शास्त्री पार्क भागात एक विचित्र घटना घडली. एका परिवारातील सगळे सदस्य मृतावस्थेत आढळले. या घटनेमुळे संपूर्ण दिल्लीमध्ये खळबळ उडाली. डासांसाठी वापरण्यात येणाऱ्या कॉइलच्या धुरामुळे हा गुदमरून मृत्यू झाला असावा असा संशय आहे.
या दुर्घटनेत ६ जण मृत्युमुखी पडले त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे की, डासांसाठी लावण्यात आलेल्या कॉइलचा धूर आणि त्यामुळे उशीला लागलेली आग यातून ही घटना घडली असावी. या घटनेत ३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शास्त्री पार्कमधील या घटनेत बचावलेल्या तीन जणांवर जगप्रवेश चंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तिघांचीही तूर्तास प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधानांनी पाहिले नवे संसदभवन… भव्य, सुसज्ज आणि नव्या रंगरूपात
मालवणीत तणावपूर्ण शांतता, पुन्हा गोंधळ, धरपकड सुरु
संभाजीनगर राड्यातील आरोपींचे सीसीटीव्ही फूटेज मिळाले
ब्रिटनच्या कोर्टातच खेचतो! ललित मोदींचा राहुल गांधींना इशारा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शास्त्रीनगर भागात घटनास्थळी पहिल्या मजल्यावर हे घर आहे. तिथे ९ जण झोपले होते. त्यातील मृत झालेल्यांमध्ये ४ पुरुष, १ महिला व एक दीड वर्षांचा मुलगा आहे. २ जणांवर उपचार सुरू आहेत त्यात एक १५ वर्षांची मुलगी आहे. एकाला उपचार करून सोडून देण्यात आले आहे.
पोलिसांनी ही माहितीही दिली की, शुक्रवारी सकाळी ९ वाजता शास्त्री पार्क पोलिस ठाण्यात एक फोन आला. त्यात मजार वाला रोड येथे एका घराला आग लागल्याचे सांगण्यात आले. त्याठिकाणी पोलिस पोहोचले तर त्या ९ जणांना रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यातील ६ जणांचा मृत्यू झाला होता. ही डासांसाठी लावण्यात आलेली कॉइल उशीवर पडली आणि हे सगळे झोपेत असताना उशीने पेट घेतला. त्यातून विषारी वायू तयार होऊन हे सगळे बेशुद्ध पडले. त्यातच सहा जणांना प्राण गमवावे लागले.