भोपाळमधील रुग्णालयाला आग; ४ बालकांचा मृत्यू  

भोपाळमधील रुग्णालयाला आग; ४ बालकांचा मृत्यू  

मध्य प्रदेशमधील भोपाळ येथील कमला नेहरु रुग्णालयात लहान मुलांच्या वॉर्डमध्ये सोमवारी (८ नोव्हेंबर) रात्री भीषण आग लागली. या आगीत चार चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग आटोक्यात आणण्यात यश आले असून दरम्यान आगीच्या घटनेमुळे रुग्णालयात गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेट आतापर्यंत चार मुलांचा मृत्यू झाला आणि एकूण ३६ मुलांना बाहेर काढले गेल्याचे वृत्त आहे. सिलेंडर फुटल्याने आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कमला नेहरु रुग्णालयातील लहान मुलांच्या वॉर्डमध्ये आग लागली तेव्हा वॉर्डमध्ये तब्बल ५० लहान मुले होती. आगीच्या घटनेमुळे लहान मुलांच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला. मोठ्या संख्येने रुग्णालयाबाहेर नातेवाईकांनी गर्दी केली होती.

राज्याचे आरोग्य मंत्री विश्वास सारंग आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटरवरून या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून ते म्हणाले की, कमला नेहरु रुग्णालयात घडलेली घटना दुर्दैवी आहे. सध्या बचावकार्य वेगाने सुरु आहे. प्रशासनाची आणि बचावपथकाची टीम काम करत आहे. तसंच या घटनेचा आढावा सातत्याने मी घेत आहे. मृत्यू झालेल्या नवजात बालकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

हे ही वाचा:

‘एसटीला भगवा दिला, पण कर्मचारी नागवा झाला’

नवाब मलिकांना न्यायालयाने झापले; ट्विटरवर उत्तरे देता, इथेही द्या!

‘अहमदनगरची दुर्घटना हे सरकारच्या निष्क्रियतेमुळे घडलेले हत्याकांड’

हिंदू पलायन झालेल्या कैरानामध्ये योगी

आग आटोक्यात आणण्यासाठी  फतेहगड, बैरागढ, पुल बोगदा आणि इतर अग्निशमन केंद्रातील आठ अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले होते.

Exit mobile version