कोल्हापुरात एका रासायनिक कारखान्याला आग लागली आहे . ही केमिकल कंपनी कोल्हापुरातील गोकुळच्या शिरगाव एमआयडीसी परिसरात आहे. शनिवारी दुपारी वाजता केमिकल कंपनीला लागलेल्या आगीने अल्पावधीतच भीषण रूप धारण केलेल की संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. कोल्हापूरच्या राष्ट्रीय महामार्गावरूनच सर्वत्र धुराचे लोट दिसत होते. आग लागल्यानंतर स्फोटांचेही आवाज येत होते. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दहा मिनिटांत घटनास्थळी पोहोचल्या. या दुर्घटनेत कोणीही ठार किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.
दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास या कंपनीला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली. ही आग सर्वप्रथम कंपनीच्या सेराफ्लेक्स युनिटमध्ये लागली, त्यानंतर काही वेळातच संपूर्ण कंपनीला आग लागली. आगीची तीव्रता बऱ्याच अंशी कमी झाली असली तरी ती पूर्णपणे विझलेली नाही. संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले दिसत आहे. आगीची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नसली तरी लाखोंची मालमत्ता जळून खाक झाली आहे.अग्निशमन दल आणि पालिकेच्या इतर यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.आगीमुळे आकाशात काळ्या धुराचे लोट पसरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
हे ही वाचा:
गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास
कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी
महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती
ही कंपनी कोल्हापुरात ज्या भागात आहे तो भाग शहरापासून थोड्या अंतरावर औद्योगिक परिसरात आहे. कोल्हापूरच्या गोकुळ शिरगावच्या एमआयडीसीमध्ये अनेक कंपन्या आहेत. आगीची तीव्रता बघता ही आग या कंपन्यांपर्यंत पसरणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे.त्यामुळे आसपासच्या कंपन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच इगतपुरी तालुक्यात मुंढेगाव शिवारात असलेल्या जिंदाल कंपनीला भीषण आग लागली होती. या आगीत जखमी झालेल्या १९ कामगारांपैकी २ कामगारांचा मृत्यू आणि १७ कामगार जखमी झाले होते.