घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर मधील भूत बंगल्यात शनिवारी पहाटे शॉर्ट सर्किट होऊन लागली. या आगीच्या धुरामुळे १२ जणांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राजावाडी रुग्णालयाकडून देण्यात आली.पहाटे ३ वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून या घटनेची नोंद पंतनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून तपास सुरू आहे.
घाटकोपर पूर्व येथील रमाबाई आंबेडकर नगर येथील शांतीनगर परिसरात असलेल्या संक्रमण शिबीर इमारत असून ही इमारत भूत बंगला या नावाने ओळखली जाते. शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास या भूतबंगल्यात इलेक्ट्रिक बॉक्स मध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ इमारतीतील रहिवाश्यांना बाहेर काढण्यात आले , त्यातील अनेकांना जणांना धुराचा त्रास होऊन त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तात्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करणाऱ्या पाच जणांच्या आवळल्या मुसक्या
पत्रकार आशुतोष आणि प्रोफेसर आनंद रंगनाथन चर्चेदरम्यान एकमेकांना भिडले
गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याची सांगत वकिलाला लुटणारा सापडला सिंधुदुर्गात
विनेशचा दावा खोटा!; ऑलिम्पिकमध्ये कोणतीही मदत मिळाली नसल्याचा केला होता आरोप
अग्निशमन दलाने दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले असून या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या १२ रहिवाश्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना धुराचा त्रास झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ८ जणांना उपचार करून सोडण्यात आले असून ४ जणांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी या आगीची नोंद केली असून तपास सुरू आहे.