24 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरक्राईमनामाबेस्ट सबस्टेशनला आग लागल्यानंतर रहिवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

बेस्ट सबस्टेशनला आग लागल्यानंतर रहिवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

कोणतीही जीवितहानी झाली नसल्याबद्दल सुटकेचा निश्वास

Google News Follow

Related

मुंबईतील प्रभादेवी परिसरातील बेस्ट सब स्टेशला आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. बेस्ट सब स्टेशनचे शटर तोडून आतील आग विझवण्यात आली. वेळेत आग विझवल्यामुळे मोठी हानी टळली आहे. या घटनेही कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या विभागातील एसआरए आणि म्हाडा इमारतीत बेस्टच्या सब ट्रान्सफॉर्मर असलेल्या रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सर्व नियम धाब्यावर बसून प्रभादेवीत रहिवाशी इमारतीत बेस्टचे ट्रान्सफॉर्मर बसवण्याचा घाट बिल्डरमार्फत घातला जात आहे. रहिवाशांच्या जीवाशी खेळून केवळ बिल्डर आपल्या फायद्यासाठी बेस्ट आणि एसआरएची त्याला साथ असल्याचा आरोप रहिवाशी करताना दिसत आहेत. बहुतांश एसआरए बिल्डिंगमध्ये हे बेस्टचे ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले आहेत. नागूसयाजीची वाडी, खेडगल्ली, प्रभादेवी, जुनी प्रभादेवी, एल्फिन्स्टन अशा अनेक प्रभादेवी येथील इमारतीत हे ट्रान्सफॉर्मर बसवून रहिवाशांचे जीव टांगणीला लागलेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे ट्रान्सफॉर्मर बिल्डर त्यांच्या सेलबल बिल्डिंगमध्ये न बसवता ते एसआरए इमारतीत बसवतात. आमच्या जीवावर बिल्डरांचे खिसे गरम होताहेत आणि आमचाच जीव टांगणीला लावायचा, अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवाशी देताहेत. रहिवाशी भीतीने ग्रासले आहेत.

हे ही वाचा:

याकुब मेमनची कबर सजतेच कशी ?

एक दिवसाच्या चिमुरडीची पोलिसांनी स्वीकारली जबाबदारी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूं यांच्या भेटीचे फोटो कंगनाने केले शेअर

नरबळीसाठी नांदेडमध्ये तरुणाची हत्या झाल्याचा संशय

 

बिल्डर ज्या वेळेस पुनर्वसन करतात. त्या वेळेस मोकळ्या जागेत हे सब स्टेशन न बांधता रहिवाशी इमारतीच्या तळमजल्यावर हे सबस्टेशन बांधून रहिवाशांना मरणाला आमंत्रणच देत असतात. स्वतःचे खिसे भरण्यासाठी, आपल्या स्वार्थासाठी हे बिल्डर माणूसकीदेखील विसरलेले आहेत. हे सबस्टेशन मोकळ्या जागेत असावेत, असा नियम आहे. परंतु बिल्डर सर्व नियम धाब्यावर बसवून हे सबस्टेशन इमारतीच्या तळमजल्यावर बांधले आहेत. जर इमारतीला पुढे-मागे धोका झाल्यास मोठ्या अपघाताला निमंत्रण येऊ शकते. या सबस्टेशनमधून बिल्डर त्याच्या टॉवरला वीजपुरवठा करताहेत.
बिल्डरच्या फायद्यासाठी सरकारी यंत्रणा कशाप्रकारे काम करतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे, अशी चर्चा केली जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा