अंधेरीतील प्राइम मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न

अंधेरीतील प्राइम मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न

अंधेरीतील प्राइम मॉलमध्ये मोठी आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता घडली असून ही आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लेव्हल चारची ही आग असल्याचे अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहे.

अल्फा इरला रोडवर हा प्राइम मॉल असून कूपर हॉस्पिटलच्या बाजुलाच हा मॉल आहे.

घटनास्थळी अग्निशमन दलाची १० फायर इंजिन पोहोचली असून ७ जंबो टँकरही त्याठिकाणी पोहोचले आहेत. श्वसन उपकरण असलेले एक वाहनही तिथे आहे.

आगीची तीव्रता प्रचंड असून आगीचे लोट आकाशाला भिडत आहेत. परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे इर्ला मार्केट परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे तातडीने रवाना झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांपूर्वी पवईतही ह्युन्डाईच्या सर्व्हिस सेंटरला आग लागली होती. ती आगही प्रचंड होती. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

याआधी लोअर परळच्या अविघ्न पार्क या इमारतीत आग लागली होती. त्यावेळी १९ व्या मजल्यावर आगीपासून बचाव करण्याच्या प्रयत्नात एक सुरक्षा रक्षक वरून कोसळून मृत्युमुखी पडला होता. ही ६० मजली इमारत होती आणि तेथे आग विझवणे हे अशक्य बनले होते.

 

हे ही वाचा:

तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

मी माझ्या वक्तव्यांवर ठाम! स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केलेला नाही

भारतीय फुटबॉलचा आवाज हरपला; नोवी कपाडिया यांचे निधन

भारताने दिल्या १०० देशांना लशी!

 

त्याआधी, मानखुर्दमध्येही आग लागली होती. त्यावेळी १०-१२ दुकाने जळली होती. ती आगही अग्निशमन दलाने आटोक्यात आणली होती. त्यात जीवितहानी झाली नव्हती. त्याआधीही सप्टेंबरमध्ये मानखुर्दमध्येच गोदामाला आग लागली होती.

Exit mobile version