पवई येथील ह्युन्डाई कार सर्व्हिस सेंटर आगीच्या तडाख्यात

पवई येथील ह्युन्डाई कार सर्व्हिस सेंटर आगीच्या तडाख्यात

पवई साकी विहार रोड येथे असलेल्या ह्युन्डाई कार सर्व्हिस सेंटरला प्रचंड आग लागली असून त्यात मोठे नुकसान झाल्याचे समोर येते आहे.

आगीची तीव्रता लक्षात घेता अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तातडीने तिथे रवाना झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. या आगीमुळे आसपासच्या परिसरातील रहिवाशांमध्ये मात्र घबराट निर्माण झाली आहे.

या आगीमागील कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार या आगीत कुणीही जखमी झालेले नाही किंवा जीवितहानीही झालेली नाही.

ही आग एवढी प्रचंड होती की, त्या सर्व्हिस सेंटरमधून काळ्या रंगाचे धुराचे लोट निघत होते. जवळपास २० ते ३० फूट उंचीवर हे आगीचे लोट जात होते. ती आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या तत्परतेने काम करत होत्या. ती आग लवकरच आटोक्यात आणण्यात यश येईल, असा विश्वास अग्निशमन दलाचे अधिकारी व्यक्त करत होते. त्यांनी तत्परतेने कारवाई करत ही आग आटोक्यात आणली आहे.

याआधी कांजुरमार्ग येथए एका सर्व्हिस सेंटरला आग लागली होती. त्यातही कोणतीही जीवितहानी झाली नव्हती किंवा कुणीही जखमी झाले नव्हते.

 

हे ही वाचा:

मेहबूबा मुफ्ती नजरकैदेत

नवाब मलिक यांची नवी पुडी

तळपत्या ‘सूर्या’ च्या किवींना झळा

मोदी पंतप्रधान झाल्यापासून महिलांची सैन्यातील भूमिका वाढली

 

अविघ्न पार्क या इमारतीतही मागे अशीच आग लागल्याच्या घटनेची पुन्हा एकदा आठवण ताजी झाली. लोअर परळमधील या इमारतीला लागलेल्या आगीत एक सुरक्षा रक्षक इमारतीच्या १९व्या मजल्यावरून पडून मृत्युमुखी पडला होता.

१२ नोव्हेंबरला मानखुर्दमध्येही आग लागली होती. त्यात भंगाराच्या गोदामाला आग लागली होती. ती आग अग्निशमन दलाच्या २० गाड्यांनी मिळून नियंत्रित केली.

Exit mobile version