भायखळाच्या दगडी चाळीत लागली आग, कुणीही जखमी नाही

अग्निशमन दलाने आटोक्यात आणली आग

भायखळाच्या दगडी चाळीत लागली आग, कुणीही जखमी नाही

भायखळा येथे असलेल्या दगडी चाळीतील एका इमारतीत आग लागल्याने खळबळ उडाली. ११ जानेवारीला रात्री ९ वाजता ही आग लागल्याचे पालिकेच्या अग्निशमन दलाला कळले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे पोहोचल्या आणि त्यावेळी दुसऱ्या मजल्यावरच्या एका खोलीला ही आग लागल्याचे समोर आले. तूर्तास कोणतीही जीवितहानी झालेली नाही किंबहुना कुणी जखमीही झालेले नाही.

आग भडकल्याने ती विझविण्यात अडथळे येत होते. घटनास्थळी अग्निशमन गाड्यांप्रमाणेच पोलिस, ट्रॅफिक पोलिस, बेस्टचे कर्मचारी तसेच रुग्णवाहिका दाखल झाली आहे, असे कळते. अग्निशमन दलाने यासंदर्भात सांगितले की, आग आटोक्यात आली आहे. त्यात कोणीही जखमी नाही.

दगडी चाळ परिसरात एका प्रीमियर क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन कुख्यात गँगस्टर अरुण गवळीच्या हस्ते करण्यात आले. मुलाच्या विवाहानिमित्त गवळी पॅरोलवर बाहेर आला आहे.

हे ही वाचा:

एटीएम मधून रोकड काढत आहात थांबा ?

एक हजार लिटर भेसळयुक्त दूध सापडले; पाच जणांना केली अटक

मागचं सरकार फ़ेसबुकवरती होतं, पण जनतेत मृत होतं

मुश्रीफांचा नंबर लागला आता अस्लम शेख

या क्रिकेट लीगचे उद्घाटन अरुण गवळीच्या हस्ते झाले असून त्याने बॅटिंग करत या स्पर्धेचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.

अरुण गवळीने पॅरोल मिळावा यासाठी अर्ज केला होता. तेव्हा तुरुंग व्यवस्थापनाने तो नामंजूर केला पण गवळीने उच्च न्यायालयात धाव घेतली आणि तिथे त्याचा पॅरोल मंजूर झाला.

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर याच्या हत्येप्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सध्या तो नागपूरच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. तिथून आता त्याला काही काळ बाहेर येता आले आहे. मुलाच्या लग्नापुरती त्याला ही सूट मिळाली आहे.

Exit mobile version