वाल्मिकी समाजाविरुद्ध एका व्हिडीओत जातीवाचक शब्द वापरल्याच्या तक्रारीवरून ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ फेम बबीता (मूनमून दत्ता) हिच्या विरुद्ध आंबोली पोलीस ठाण्यात एट्रोसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. वाल्मिकी विकास संघाचे पदाधिकारी विनोद काजनिया यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.
टीव्ही कलाकार मूनमून दत्ता हिचा काही आठवड्यापूर्वी एक व्हिडिओ समाज माध्यमावर मोठया प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये तीने वाल्मिकी समाजाला उद्देशून वादग्रस्त वक्तव्य केले होते. तिच्या या वक्तव्यमुळे वाल्मिकी समाजाच्या अनेकांची मन दुखावली गेली होती. या प्रकरणी वाल्मिकी विकास संघाचे पदाधिकारी विनोद काजनिया यांनी प्रथम आरे पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. मात्र मूनमून दत्ता ही आंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहण्यास असल्यामुळे ही तक्रार आंबोली पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली.
हे ही वाचा:
दहावी मूल्यांकन पद्धतीबाबत शाळा, पालक संभ्रमातच
ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध
फेसबुक, गूगल नरमले, ट्विटरचा माज कायम
ठाकरे सरकार पुन्हा तोंडावर आपटले
आंबोली पोलिसांनी या तक्रारीवरून मूनमून दत्ता हिच्याविरुद्ध अॅट्रोसीटीस अॅक्ट २०१५ अंतर्गत भा. द.वि. सह कलम २९५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्री मध्ये वाल्मिकी समाजाचे कित्येक नामांकित कलाकार आहेत आणि सर्व देखणे आहेत. त्यामुळे मूनमून दत्ता यांनी सरसकट एका जातीविशेष समुदायाचे लोकं यांस विद्रूप दिसतात, असे संबोधन करणे दुर्भाग्यपूर्ण आहे. दत्ता यांचे वक्तव्य अत्यंत बेजबाबदार आणि जातीवाचक असून तिच्यावर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे, असे मत मुंबई कॉंग्रेसचे कार्यकारी सदस्य राजेश इंगळे यांनी व्यक्त केली.