हिंदूद्वेष्ट्या शर्जील उस्मानी विरोधात दिल्लीत गुन्हा दाखल झाला आहे. उस्मानीच्या अक्षेपार्ह ट्विट्स साठी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्विटर पोस्ट मधून प्रभु श्रीरामांची बदनामी केल्याप्रकरणी उस्मानी वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता उस्मानीच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.
अलिगड मुस्लीम युनिव्हर्सिटीचा पूर्व विद्यार्थी नेता उस्मानी हा कायमच आपल्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असतो. या वर्षाच्या सुरुवातीला उस्मानीने पुण्यात येऊन हिंदू समाजाला सडलेले असे म्हणत वाद ओढवून घेतला होता. तर काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ पत्रकार रोहित सरदाना यांच्या निधनानंतर आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे उस्मानी विरोधात टीकेची झोड उठली होती. आता पुन्हा एकदा उस्मानीने हिंदू समाजाचे आराध्य दैवत असलेल्या प्रभु श्रीरामांची बदनामी केल्याप्रकरणी तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
हे ही वाचा:
वैमानिक दीपक साठे यांची नुकसानभरपाई ठाकरे सरकारने अडवली
लोकांच्या डोळ्यासमोर अंधार झाल्यानंतरच ठाकरे सरकारचे डोळे उघडणार आहेत का?
अजित दादा, उद्धव ठाकरेंना सल्ला द्या
शर्जिलच्या आक्षेपर्ह ट्विटसाठी दिल्ली भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवीन कुमार यांनी तक्रार दाखल केली होती. धार्मिक भावना दुखावण्याचा हेतूने उस्मानीने ट्वीट केल्याचे कुमार यांनी तक्रारीत म्हटले आहे. बुधवार, १९ मे रोजी रात्री दिल्लीच्या लक्ष्मी नगर पोलीस स्टेशन मध्ये नवीन कुमार यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर दिल्ली पोलिसांनी उस्मानी विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या आधी महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातही या आक्षेपार्ह ट्विटसाठी उस्मानी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.