ट्विटचा डाव उलटला… पीडितेच्या त्या फोटोवरून राऊतांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्याचा केला प्रयत्न

ट्विटचा डाव उलटला… पीडितेच्या त्या फोटोवरून राऊतांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा

बार्शी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हल्ल्यासंदर्भात ट्विट केलेल्या फोटोमुळे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या फोटोवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्नात असलेला डाव राऊत यांच्यावरच उलटला असल्याचे दिसून येत आहे. बार्शीतील या घटनेचे फोटो ट्विट केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात बार्शी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. पोक्सो कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेलं आहे. संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी हा फोटो ट्विट केला होता.

बार्शी तालुक्यातील बळेवाडीमध्ये काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर दोन मुलांनी बलात्कार करण्याची घटना घडली होती. या पीडितेने पोलिसांमध्ये तक्रार केली. त्यानंतर त्याच दिवशी तिच्यावर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली. या घटनेचे राज्यसभेत पडसाद उमटले होते. खासदार संजय राऊत यांनी पीडितेचा जखमी व रक्तबंबाळ अवस्थेतील फोटो ट्विट केला. या ट्विटमधून संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न केला होता.

हे ही वाचा:

लंडनमध्ये भारतीय दुतावासातील कर्मचाऱ्याने खलिस्तानी समर्थकांना शिकवला धडा

प्रकाश सुर्वे यांचा बॅनर काढल्यावरून भाजपा कार्यकर्त्याला मारहाण, रुग्णालयात उपचार सुरू

अमृता फडणवीसांना धमकावणाऱ्या अनिल जयसिंघानीच्या मुसक्या आवळल्या

‘सावरकर समझा क्या, नाम राहुल गांधी है’ यावरून राहुल गांधी निशाण्यावर

भाजप नेत्या चित्र वाघ यांचा हल्लाबोल

संजय राऊत यांच्या ट्वीटवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात दोन्ही आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करत अटक झाली आहे. आताही आरोपी जेलमध्ये आहेत ही वस्तुस्थिती असताना का तुम्ही खोटी माहिती देताय? सगळ्यात महत्वाचं तुम्ही पीडितेचा फोटो कसा काय व्हायरल केलात?” असे प्रश्न चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना विचारला आहे. चित्रा वाघ यांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना टॅग करत संजय राऊत यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.

काय ट्विट केलं होतं

देवेंद्रजी.हे चित्र बार्शीतले आहे.. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका.भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे.गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत ?५ मार्चला हल्ला झाला आरोपी मोकाट आहेत. असं ट्विट राऊत यांनी केली होतं (आत या ट्विटमधून पीडितेच्या फोटो ट्विटरकडून काढून टाकण्यात आला आहे.)

 

Exit mobile version