मनसुख हिरेन प्रकरणात एफआयआर दाखल

मनसुख हिरेन प्रकरणात एफआयआर दाखल

ठाण्याचे उद्योगपती मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दहशतवाद विरोधी पथकाने हा एफआयआर दाखल केला आहे. या एफआयआर मध्ये हत्येच्या गुन्ह्याचे कलम लावण्यात आले आहे.

रविवारी दहशतवाद विरोधी पथकाने उद्योगपती मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू परकरणात एफआयआर दाखल केला. दहशतवाद विरोधी पथकाने दाखल केलेल्या या एफआयआर मध्ये हत्या, गुन्ह्याचा कट रचणे, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणे या गुन्हांची कलमे लावण्यात आली आहेत. या एफआयआर मध्ये कोणत्याही व्यक्तीचे नाव घेण्यात आले नसून अज्ञात व्यक्तींविरोधात हा एफआयआर केला गेला आहे. मुंब्रा पोलिसांनी नियमानुसार या प्रकरणातील सगळी कागदपत्रे दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपवली आहेत.

मनसुख हिरेन हे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक होते. हिरेन यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले. ठाणे येथील मुंब्र्याजवळच्या खाडीत हिरेन यांचा मृतदेह संशयास्पदरित्या सापडला. विधानसभेत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा उचलल्यानंतर थोड्याच वेळात मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला. राज्यातील विरोधी पक्षाकडून या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडे द्यावा अशी मागणी वारंवार होत असली तरी राज्य सरकारने हा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपवला आहे.हिरेन यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे म्हटले आहे. आपले पती आत्महत्या करू शकत नाहीत असा दावा मनसुख यांच्या पत्नीने केला आहे.

Exit mobile version