नवी मुंबईतील बार प्रकरणी समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल

नवी मुंबईतील बार प्रकरणी समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कमी वयात मद्यविक्रीचा परवाना मिळविल्याच्या प्रकरणा वरून तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांनी खोटी माहिती देऊन मद्य विक्रीचा परवाना मिळवला असल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे.

नवी मुंबईमधील वाशी येथे समीर वानखेडे यांच्या नावावर एक बार आहे. या बारसाठी १९९६ ते ९७ या काळात खोटी माहिती देऊन परवाना मिळविला होता. याबाबत उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी शंकर गोगावले यांनी समीर वानखेडेंविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये मतदानाला सुरुवात

… म्हणून विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटर अकाऊंट केलं डिऍक्टिव्हेट

मिशन श्रीलंकासाठी भारतीय संघ जाहीर! कसोटी संघाचे नेतृत्वही रोहित शर्माकडे

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १०० ‘किसान ड्रोन्स’ ना हिरवा झेंडा

मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणानंतर समीर वानखेडे वादात सापडले होते. मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. समीर वानखेडे हे चुकीच्या कारवाया करतात, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. अवघ्या १७ व्या वर्षी समीर वानखेडेंनी बारचा परवाना मिळविल्याचा आरोप नवाब मलिकांनी केली होता. त्यानंतर वानखेडेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी चौकशी केली असता परवाना मिळविला त्यावेळी समीर वानखेडे यांचे वय कमी असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी घेण्यात आली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बारचा परवाना रद्द केला होता. आता वानखेडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version