एनबीटीचे संपादक रूबिन डी’क्रुझ यांच्यावर दिल्लीतील एका महिलेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांत एफआयआरदेखील दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
रूबिन डी’क्रुझ हे सध्या नॅशनल बुक ट्रस्टच्या (एनबीटी) मल्याळी विभागाचे संपादक आहेत. त्यापुर्वी ते केरळ राज्याच्या इन्स्टिट्युट ऑफ चिल्ड्रन्स लिटरेचरचे संपादक होते. भारतीय दंडविधा संहितेच्या कलम ३५४ (महिलांवरील अत्याचार)च्या अंतर्गत त्यांच्यावर दिल्लीच्या वसंत कुंज पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर हा एफआयआर दाखल केला गेला आहे.
ज्या महिलेने रूबिन यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, तिने हा प्रसंग फेसबुकवर उघड केला आहे. तिच्या सांगण्यानुसार रूबिन यांनी सदर महिलेला प्रथम आपल्या घरी बोलवले आणि नंतर आपले रंग दाखवायला सुरूवात केली. तिने केलेल्या तक्रारीनुसार हा प्रसंग २ ऑक्टोबर २०२० रोजी घडला आणि या महिलेने एफआयआर २१ फेब्रुवारी २०२१ रोजी दाखल केली आहे.
या महिलेने असे देखील उघड केले आहे, की यानंतर तिला बराच काळ मानसिक तणावाचा सामना करावा लागला होता. तिने लैंगिक समता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असल्याचे मिरवणाऱ्या डाव्यांकडे बोट दाखवले आहे. तिने हे देखील सांगितले की, अनेक डावे विचारवंत अजूनही रूबिन डी’क्रुझ यांचे समर्थन करत आहेत.