लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक युद्ध होत असताना राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. हे वक्तव्य आता वडेट्टीवार यांना भोवण्याची चिन्हे आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर नागपुरात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर निवडणूक निर्णय अधिकारी संजय बोकाडे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी विजय वडेट्टीवार यांनी शहीद हेमंत करकरे यांच्या हत्याप्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केले होते. हेमंत करकरे यांच्या मृत्यूबद्दल संशय त्यांनी व्यक्त केला होता. त्यांना लागलेली गोळी ही दहशतवादी कसाब याची नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एका पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीची असल्याचे विधान त्यांनी केले होते. शिवाय भाजपावरही त्यांनी आरोप केले होते. त्यानंतर भाजपच्या विधी सेलने विजय वडेट्टीवार हे अशी वक्तव्य करून आचारसंहितेचा भंग करत आहे आणि समाजात तेढ निर्माण करत आहे अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. पुढे निवडणूक आयोगाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून वडेट्टीवार यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हे ही वाचा:
पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकविरोधी निदर्शनात फडकला तिरंगा
२५ गोळ्या मारून पाकिस्तनाचे ड्रोन बीएसएफने पळवून लावले!
लव्ह जिहादचे प्रकरण; हिंदू असल्याची बतावणी करून २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार
खळबळजनक! आई, पत्नी, मुलांची हत्या करून आरोपीची गोळ्या झाडून आत्महत्या
हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी कसाबच्या किंवा कुठल्याही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती. ती गोळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या पिस्तुलमधील होती. त्यावेळेस ते पुरावे लपवणारा देशद्रोही उज्ज्वल निकम आहेत. अशा देशद्रोह्याला भाजपाने तिकीट दिली आहे तर भाजपा देशद्रोह्यांना पाठीशी घालणारा पक्ष आहे, असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले होते.