30 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरक्राईमनामा'त्या' बसचालकाविरोधात गुन्हा दाखल

‘त्या’ बसचालकाविरोधात गुन्हा दाखल

Google News Follow

Related

औरंगाबादच्या रस्त्यावर तिरप्या चालणाऱ्या बसचा थरारक व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये तिरपी चालणारी बस एका बाईकस्वाराला धडकताना दिसली होती. या बस चालकाविरोधात औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेंट्रल बॅलन्स गेल्यामुळे धुळे आगाराची एक बस तिरपी झाली  होती. ही बस तशीच दामटवणाऱ्या एसटी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी धुळे आगाराचे बस चालक रमेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद रोडवरील घटनेचा व्हिडीओ नुकताच उजेडात आला होता.

हे ही वाचा:

पुरूष हॉकी संघाचे राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून कौतूक

प्रतिस्पर्धी कुस्तीगीर रविकुमारच्या दंडाचा चावा घेत राहिला, पण…

उपाहारगृहे, हॉटेलात ४ नंतर कोरोनाची भीती?

मराठा आरक्षणाच्या बाबतीत ठोस निर्णय घेण्याची धमक ठाकरे सरकारमध्ये नाही

तिरप्या बसचा धक्का लागून बाईक पडल्याचं व्हिडीओमध्ये दिसत होतं. या व्हिडिओमधील जखमी बाईकचालक साहेबसिंग कवाळे यांच्या तक्रारीवरुन रमेश पाटलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाचप्रकारे काही दुचाकी चालक जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. औरंगाबादच्या छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सेंट्रल बॅलन्स बिघडल्यामुळे धुळे आगारातील संबंधित एसटी बस तिरपी धावत होती. हे ध्यानात आल्या नंतरही एसटी न थांबवता चालकाने बस तशीच दामटवली. बसच्या धक्क्याने एक बाईक भररस्त्यात पडताना व्हिडीओमध्ये कैद झाले आहे. तर आणखी काही बाईकस्वारही जखमी झाल्याची माहिती आहे. तिरप्या बसचा धक्का लागल्यामुळे एका तरुणाने व्हिडीओ शूट केला.

धुळे आगाराच्या तिरप्या बसमुळे औरंगाबादमधील खुलताबाद रस्त्यावर अनेक ठिकाणी अपघातांना निमंत्रण मिळालं. तिरप्या बसमुळे दुचाकी चालकांना धक्का लागत असतानाही चालकाने बस बेदरकार तशीच चालवल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा