कंगनाला सीआयएसएफच्या महिला कॉन्स्टेबलने लगावली थप्पड; केले निलंबित, चौकशी सुरू

त्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

कंगनाला सीआयएसएफच्या महिला कॉन्स्टेबलने लगावली थप्पड; केले निलंबित, चौकशी सुरू

हिमाचल प्रदेशमधून नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौट हिला चंदीगढ विमानतळावर एका सीआयएसएफच्या महिला कॉन्स्टेबलने थप्पड लगावल्याचे प्रकरण समोर आले असून यासंदर्भात त्या महिला कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे शिवाय, तिच्या या कृतीनंतर एक समिती स्थापन करून चौकशी करण्यात येत आहे.

कंगना रनौट ही चंदिगढ विमानतळावर आल्यानंतर या कुलविंदर कौर नावाच्या महिला कॉन्स्टेबलने तिला थप्पड लगावली. नंतर तिने आपला राग व्यक्त केला. त्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात ती महिला म्हणते की, कंगनाने केलेल्या ट्विटचा राग म्हणून तिने हे कृत्य केले आहे. कंगनाने २०२१मध्ये ट्विट करताना शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महिला १०० रुपये देऊन आणल्या जातात असे विधान केले होते. नंतर ते ट्विट तिने डीलिट केले. पण त्याचा राग मनात ठेवून या कॉन्स्टेबलने हे कृत्य केल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा:

पवई दगडफेक प्रकरणी २००जणांविरुद्ध गुन्हा दाखल

विशालने विझवली मशाल, खर्गेंना दिले पाठिंब्याचे पत्र!

निरपराध शेळीला मारण्यापेक्षा द्रमुक कार्यकर्त्यांनी माझ्याकडे यायला हवे होते !

दहशतवादाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले अमृतपाल, शेख रशीद निवडून आलेत, पुढे काय?

याबाबत कंगनानेही व्हीडिओ करून आपली भूमिका मांडली. आपल्यावर हा हल्ला झाल्याचे ती म्हणाली. आपल्या चेहऱ्यावर तिने मारले असे तिने सांगितले. आपण पंजाबमधील खलिस्तानी चळवळीच्या विरोधात असून त्यासंदर्भात कठोर पावले उचलली गेली पाहिजेत, असेही ती म्हणाली.

या महिला कॉन्स्टेबलने २०२१च्या ट्विटवर आताच हा राग का व्यक्त केला? यामागे आणखी कोणती कारणे आहेत, हे सगळे आता चौकशीतून समोर येणार आहे. कंगना रनौटने हिमाचल प्रदेशातील मंडी येथून लोकसभा निवडणूक लढवत विक्रमाादित्य सिंग यांना पराभूत केले. तिचा हा मोठा विजय मानला जात आहे.

 

Exit mobile version