परमबीर यांच्यासंदर्भातील फाइल गृहविभागातून गहाळ

परमबीर यांच्यासंदर्भातील फाइल गृहविभागातून गहाळ

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासंदर्भातील एक फाईल गृहविभागातून गहाळ झाल्याचे समोर आले आहे. मध्य विभाग सायबर सेलने स्वतंत्र गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे.

यासंदर्भात परमबीर यांचे निकटवर्तीय संजय पुनामिया, सनी पुनामिया आणि इतर आरोपीविरोधात झालाय गुन्हा दाखल झाला आहे. गृहविभागातील एक महत्वाची फाईल लीक झाली होती. ज्याचे पीडीएफ खंडणी प्रकरणातील आरोपी संजय पुनामिया याच्या मोबाईलमध्ये सापडले. त्यानुसार पोलिसांनीच यामध्ये फिर्याद दिली आणि यात मध्य विभाग सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

ही फाइल कुणालाही माहितीच्या अधिकारात देण्यात आलेली नसताना ती गहाळ कशी झाली याविषयी संशय व्यक्त केला जात आहे.

 

हे ही वाचा:

मार्चपर्यंत महाराष्ट्रात भाजपाचे सरकार?

वानखेडे प्रकरणातला निर्णय कळलाच नाही म्हणत मलिक गेले न्यायालयात

फडणवीसांची दिल्लीवारी ही संघटनात्मक बैठकीसाठीच

परमबीर यांचे अजामीनपात्र वॉरंट रद्द

 

सध्या मुंबई सायबर सेलकडून ह्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मंत्रालयाच्या गृहविभागातील परमबीर सिंग यांच्या संदर्भातील ही महत्वाची फाईल गायब झाली आहे. २८ पानांची ही फाईल आहे. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात संजय पुनमिया यांच्या विरोधात चोरिचा गुन्हा दाखल झाला आहे. संजय पुनमिया यांनी आपल्या मुलाच्या मोबाईलवर ही फाईल पाठवल्याचा संशय पोलिसांना असून याप्रकरणी तपास सुरू आहे.

यासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. परमबीर यांच्या पोलिस सेवा नियमांनुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असेही वळसे पाटील म्हणाले.

Exit mobile version