कांदिवली पोलिसांनी बोगस लसीकरण प्रकरणी अटक करण्यात आलेल्या टोळीने मुंबईत ९ ठिकाणी बोगस लसीकरण केल्याचे धक्कादायक माहिती चौकशीत समोर आली आहे. मुंबईत बोगस लसीकरण प्रकरणी पाचवा गुन्हा भोईवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. या टोळीने परळच्या पोद्दार सेंटर मध्ये २८ आणि २९ मे रोजी लसीकरण मोहीम राबवली होती अशी माहिती समोर येत आहे.
बोगस लसीकरण टोळीचा मुख्य महेंद्र सिंग याने बोगस लसीकरणातून २ हजार २६० जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. कांदिवली येथील हिरानंदानी हेरिटेज सोसायटी या ठिकाणी झालेल्या बोगस लसीकरण प्रकरणी कांदिवली पोलिसांनी पहिला गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात बोगस लसीकरण मोहिमेतील प्रमुख महेंद्र सिंह याच्यासह सहा जणांना अटक केली होती.
हे ही वाचा:
दि. बा. पाटील नाव द्या, नाहीतर विमानतळाचे काम चालू देणार नाही
कंगना रनौत स्वतःच दिग्दर्शित करणार ‘इमर्जन्सी’
बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्या, पण स्कायवॉक पूर्ण करा!
मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे
हिरानंदानी या ठिकाणी ३९० रहिवाश्यांचे बोगस लसीकरण करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. त्यापैकी काही जणांना आलेले लसीकरणचे प्रमाणपत्र देखील बोगस असल्याचे उघडकीस आले होते. कांदिवली पाठोपाठ वर्सोवा, बोरिवली, खार आणि बुधवारी परळ येथील भोईवाडा पोलीस ठाण्यात बोगस लसीकरण प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
परळ येथील पोद्दार सेंटर या ठिकाणी २८ आणि २९ मे रोजी लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती. या ठिकाणी २०७ कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले होते. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना नानावटी आणि लाईफ लाईन केअर रुग्णालयाच्या नावाने प्रमाणपत्र देण्यात आले होते. या लसीकरणच्या नावाखाली २लाख ४४हजार ८००रुपये उकळण्यात आले आहे. या बोगस लसीकरणाचे आयोजन महेंद्र सिंह, श्रीकांत माने आणि सीमा सिंह यांनी केले होते.
महेंद्र सिंह हा या बोगस लसीकरणाचा टोळीचा मुख्य सूत्रधार असून त्याने प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तींना या बोगस लसीकरणात सामील करून घेतले आहे. भोईवाडा पोलिसांनी महेंद्र सिंह, सीमा सिंह आणि श्रीकांत माने यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान कांदिवली पोलिसानी नेस्को कोविड सेंटर मध्ये कंत्राटी कामगार असणाऱ्या गुडीया यादव हिला अटक केली आहे, गुडीया यादव ने नेस्कोतील कोविन अप्सचे युजरनेम आणि पासवर्ड चोरला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. बोगस लसीकरणातील ही सहावी अटक आहे.