सलमान खान गोळीबार प्रकरणी पाचवा आरोपी राजस्थानमधून गजाआड

आरोपीची शूटर्सना आर्थिक आणि रेकी करण्यासाठी मदत

सलमान खान गोळीबार प्रकरणी पाचवा आरोपी राजस्थानमधून गजाआड

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाला होता. याप्रकरणी बिश्नोई टोळीचा संबंध असल्याचे समोर आले होते. तर, चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. यातील एका आरोपीने तुरुंगात आत्महत्या केली आहे. आता याप्रकरणी मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील पाचव्या आरोपीला अटक केली आहे. या आरोपीचे नाव मोहम्मद रफिक चौधरी आहे.

मुंबई पोलिसांच्या गु्न्हे शाखेने सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. राजस्थानमध्ये ही कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी मोहम्मद रफिक चौधरी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. चौधरी याने या प्रकरणात अटक केलेल्या सागर पाल आणि विकी गुप्ता या दोन शूटर्सना आर्थिक आणि रेकी करण्यासाठी मदत केली होती. आरोपी चौधरीला पोलीस मुंबईत आणणार असून न्यायालयात हजर करणार आहे. पोलीस कोठडीची मागणी करणार असल्याची माहिती आहे.

हे ही वाचा:

विजयपुरा ऑनर किलिंग प्रकरणः हिंदू मुलाशी लग्न केल्याप्रकरणी गर्भवती मुस्लिम महिलेला पेटवून दिले!

झारखंड रोख रक्कम जप्तीचे प्रकरण; १० हजार रुपयांच्या लाचेच्या मागावरून कोट्यवधींची वसुली

ममता बॅनर्जी यांच्याबद्दलचे मीम पोस्ट करणाऱ्याला कोलकाता पोलिसांचे समन्स

“राहुल गांधींना राम मंदिराचा निकाल उलथवायचा होता”

सलमान खान याच्या घराबाहेर १४ एप्रिल रोजी दोन दुचाकीस्वारांनी गोळीबार केला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेची जबाबदारी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याने घेतली. अभिनेता सलमान खान हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर असून अनेक वेळा सलमान खान आणि त्याचे वडील सलिम खान यांना लॉरेन्स बिश्नोई कडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी दोन जणांना अटक केली होती पुढे या प्रकरणात आणखी दोघांना पंजाबमधून मुंबई गुन्हे शाखेने अटक केली. यांनी शस्त्र पुरवल्याचा आरोप आहे. यातील अनुज थापन याने तुरुंगातचं चादरीने गळफास घेत आत्महत्या केली.

Exit mobile version