पुणे पोलिसांनी कोथरूड परिसरातून १८ जुलै रोजी दोन जणांना अटक केली होती. तपासादरम्यान दोन्ही अटकेत असलेले आरोपी हे दहशतवादी असल्याचे समोर आले होते. तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेकडील (एनआयए) गुन्ह्यात फरारी असल्याचे आणि त्यांच्याविरुध्द प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी पुढे आणखी दोघांना अटक करण्यात आली होती.
दरम्यान, अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून राज्य दहशतवादीविरोधी पथकाने (एटीएस) मंगळवार, १ ऑगस्ट रोजी आणखी एका आरोपीला अटक केली. अली बडोदावाला (रा. पडघा, ठाणे) असे अटक केलेल्या पाचव्या आरोपीचे नाव आहे. झुल्फिकार हा एनआयएच्या कोठडीत होता. न्यायालयाची परवानगी घेऊन त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
पुणे पोलिसांनी १८ जुलै रोजी महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान (वय २३) आणि महम्मद युसूफ महम्मद याकूब साकी (वय २४) या दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. मध्यप्रदेशच्या रतलाममधील मूळ रहिवासी असलेले हे दोघे जयपूर बॉम्बस्फोट कटातील फरार आरोपी आहेत. ‘एटीएस’ने यापूर्वी या दहशतवाद्यांच्या कोंढव्यातील घरातून ड्रोन, संवेदनशील स्थळांची छायाचित्रे आणि लॅपटॉमधून पाचशे जीबी डेटा हस्तगत केला होता. त्यानंतर ‘एटीएस’ने तपासादरम्यान दोन दहशतवाद्यांकडून बॉम्ब तयार करण्याचे रसायन आणि प्रयोगशाळेतील उपकरणे जप्त केली आहेत. शिवाय त्यांच्या घराच्या पंख्यामध्ये बॉम्ब कसा बनवायचा याची चिठ्ठी सापडली.
दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय ३२) आणि आर्थिक रसद पुरविणाऱ्या सिमाब नसरुद्दीन काझी (वय २७) या दोघांना अटक केली होती. त्यानंतर आता झुल्फिकार बडोदावाला याला अटक झाली आहे.
हे ही वाचा:
६००० गुन्हे दाखल पण ७ जणांनाच अटक का?
टिळकांनी सावरकरांना देशकार्यासाठी प्रोत्साहित केले!
मुसेवाला हत्येचा कट रचणारा सचिन थापन पोलिसांच्या ताब्यात ! लवकरच भारतात आणणार
लोकमान्य टिळकांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य!
पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांचे इसिस ‘कनेक्शन’?
एनआयएने २८ जून २०२३ रोजी इसिस दहशतवादी संघटनेच्या इशाऱ्यावर कारवाया केल्याप्रकरणी चार आरोपींना अटक केली होती. त्यात झुल्फिकार बडोदावाला याचा समावेश होता. तर नुकतंच एनआयएने डॉ. अदनान अली सरकार याला कोंढव्यातून अटक केली. झुल्फिकार हा अदनान अली याचा निकटवर्तीय असल्याची माहिती आहे. त्यावरून पुण्यात पकडलेले दहशतवादी आणि इसिसचे कनेक्शन असल्याचा संशय आहे.