नर्मदा परिक्रमा करणाऱ्या महिला भाविकांवर कट्टरवाद्यांकडून थुंकण्याचा प्रकार!

हिंदू संघटनेकडून रॅली काढत निषेध, आरोपी मोहसीन, अक्रम आणि इस्लामला अटक

नर्मदा परिक्रमा करणाऱ्या महिला भाविकांवर कट्टरवाद्यांकडून थुंकण्याचा प्रकार!

मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील खाटेगाव पोलीस स्टेशन परिसरातील तामखान गावात १७ फेब्रुवारी रोजी नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविकांवर कट्टरवाद्यांकडून थुंकल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संतप्त झालेल्या हिंदू संघटनांनी निषेध दर्शवत बुधवारी (१९ फेब्रुवारी) शहर पूर्णपणे बंद ठेवले आणि भगवे झेंडे घेऊन रॅली काढली. यानंतर जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांच्या नावे अतिरिक्त एसपी आणि एसडीएम यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, ही घटना तामखान मशिदीसमोर घडली आणि तेथील मौलवीसह उपस्थितांनी भाविकांशी असभ्य वर्तन केले. या सर्व लोकांवर कारवाई करण्यात यावी. हिंदू संघटनांचा असाही आरोप आहे की, सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून तामखान मशीद बांधण्यात आली आहे. तिथे अनैतिक, बेकायदेशीर आणि असंवैधानिक कृत्ये केली जातात. ही बेकायदेशीर मशिदी आणि सभोवतालची घरे पाडण्याची मागणीही मागणी हिंदू संघटनांनी केली आहे.

खरेतर, बरवानी येथील रहिवासी प्रकाश यादव हे त्यांच्या पत्नीसोबत दुचाकीवरून नर्मदा परिक्रमा करत होते. जेव्हा ते  तामखान मशिदीसमोरून जात होते तेव्हा त्यांची मुस्लीम मुलांशी बाचाबाची झाली. मुस्लिम मुलांनी प्रकाश यादव आणि त्यांच्या पत्नीशी गैरवर्तन करायला सुरुवात केली. यादरम्यान, मुस्लीम मुलांनी प्रकाश यादव यांच्या पत्नीवर थुंकले.

हे ही वाचा : 

एकनाथ शिंदेंच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या दोघांना बुलढाण्यातून अटक

इस्रायलमध्ये बस स्फोटांची मालिका; दोन बसमध्ये आढळली स्फोटके

‘शिवाजी विद्यापीठा’चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ नामांतराची आंदोलनाद्वारे मागणी

‘सेव्ह टायगर’ मुळे गळती थांबेल ?

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मोहसीन, अक्रम आणि इस्लाम नावाच्या आरोपींना अटक केली आणि त्यांची परेड काढली. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरु आहे. दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी नुकताच मोठा निर्णय घेतला होता. मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील ५४ गावांची नावे बदलण्याची घोषणा मुख्यमंत्री मोहन यांनी केली होती. या ५४ गावांमध्ये तामखान गावाचाही समावेश आहे, ज्याचे नाव आता कान्हापूर असे ठेवण्यात येणार आहे.

 

मित्रपक्षाला धक्क्याला लावणारे आज बनले 'धक्का पुरुष'! | Mahesh Vichare | Uddhav Thackeray | Shivsena

Exit mobile version